Renapur stray dogs menace : रेणापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

नागरिक त्रस्त, नगरपंचायत बंदोबस्त कधी करणार?
Renapur stray dogs menace
रेणापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाpudhari photo
Published on
Updated on

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षभरात जवळपास 663 वाटसरूंना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी न्यायालयाने राज्य व प्रशासाला कडक निर्बंध घातले असतानाही बंदोबस्त होत नसल्याचे दिसून येत आहे.

त्वचारोगाने त्रस्त झालेल्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना खाज सुटणे , अंगावर पुरळ येणे यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांचा नगर पंचायत कधी बंदोबस्त करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रेणापूर तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ज्या ठिकाणी मास मच्छी विकली जाते अशा ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर दिसून येत आहे.

Renapur stray dogs menace
Stray Dogs Attacks : मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा चिमुकल्यावर हल्ला

याशिवाय मार्केट, गृह संकुल, शाळा, पदपथरस्ते, शासकीय रुग्णालयात व सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यांमध्ये बहुतांश कुत्री ही हिंसक स्वरूपाची असतात. त्यामुळे रात्री व दिवसा रस्त्यावरून फिरणाऱ्या व मोटारसायकलवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर अशी कुत्री थेट धावून येत आहेत व त्यांच्यावर ते बेधडक हल्ला करीत आहेत.

लहान मुले व वृद्ध व्यक्तीना कुत्र्यांचा अधिक त्रास होताना दिसत आहे. तालुक्यातील त्या-त्या ग्रामपंचायतींनी व रेणापूरच्या नगर पंचायतीने अशा कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठीची मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Renapur stray dogs menace
Stray dog attack : पाच मोकाट कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; नारेगावात घराच्या ओट्यावरून ओढत नेले

2025 मासिक निहाय श्वानचावे

जानेवारी - 52 , फेब्रुवारी- 62 , मार्च - 56 , एप्रील- 49 , मे - 58 , जुन - 52 , जुलै - 62 , ऑगष्ट- 45 , सप्टेंबर- 52 , आक्टोबर - 43 , नोव्हेंबर - 71 तर डिसेंबर - 61

त्वचारोगी श्वानांपासून संसर्गाचा धोका

भटक्या , मरतुकड्या व अस्वच्छ कुत्र्यांना होणारी खरूज, नायटा यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्वचा रोगांला बळी पडावे लागत आहे त्यामुळे तीव्र खाज सुटणे , पुरळ येणे किंवा जखमा होऊन सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा रोगांना लहान मुले व वृद्ध बळी पडत आहेत.

ज्या ठिकाणी खरजुल्या कुत्र्यांचा वावर असतो अशा ठिकाणी शक्यतो नागरिकांनी बसू नये भटक्या कुत्र्यांच्या त्वचारोगामुळे पाळीव कुत्र्यांनाही आजार होऊ शकतो. पिसाळलेल्या , अस्वच्छ व केस गळालेल्या कुत्र्यांपासून शक्यतो दूर राहवे त्यांना स्पर्श करू नये, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news