Stray dog attack : पाच मोकाट कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; नारेगावात घराच्या ओट्यावरून ओढत नेले

सहेरीसाठी उठलेल्या चार वर्षीय आयशावर कुत्र्यांचा हल्ला; घाटी रुग्णालयात उपचार सुरू
Stray dog attack
कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली चार वर्षीय चिमुकली आयशा.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव परिसरात सहेरीसाठी उठलेल्या चार वर्षीय आयशा शेख या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) पहाटे घडली. घराच्या ओट्यावरून ओढत नेत पाच कुत्र्यांच्या टोळक्याने या चिमुकलीला गंभीर जखमी केले असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरात दहशतीचे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शहरात मागील वर्षभरात मोकाट कुत्र्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक बसाहतीमध्ये किमान दोनशेहून अधिक कुर्त्यांची टोळकी फिरताना दिसतात. यामुळे पादचारी पहाटे आणि रात्री घरातून बाहेर पडणे टाळतात. महापालिकेकडून या मोकाट कुत्र्यांच्या योग्य बंदोबस्त होत नसल्याचे चित्र आहे. मोकाट कुत्र्यांना बंदिस्त करून ठेवावे, असे निर्देश असतानाही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव रोजा ठेवण्यासाठी पहाटेच सहेरीसाठी उठतात. नारेगावातही शेख कुटुंबीय शनिवारी पहाटे सहेरीच्या तयारीत होते.

Stray dog attack
Parbhani News : परभणी जिल्ह्यात रुग्णांसाठी 'उपशामक काळजी सेवा' उपक्रम सुरु

यावेळी घरातून चार वर्षीय आयशा ओट्यावर येऊन उभी राहिली. अचानक चार ते पाच कुत्र्यांच्या टोळक्याने तिला ओट्यावरून ओढत नेले आणि तिच्या शरीराचे लचके तोडले. चिमुकलीच्या ओरडण्याच्या आणि रडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी तसेच तिची आई नसीम बेगम यांनी तातडीने धाव घेत आयशाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.

भयभीत आणि गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे आणि मतीन पटेल घटनास्थळी दाखल झाले. विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शाहेद शेख यांना माहिती दिल्यानंतर तातडीने कुत्रे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनी रात्री उशिरा घाटी रुग्णालयात जाऊन नारेगाव येथील जखमी मुलगी आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपचारात कोणतीही कमतरता पडणार नाही असे आश्वासन दिले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

१०० पेक्षा अधिक जखमा

कुत्र्यांच्या हल्लात जखमी झालेल्या आयशाच्या शरीरावर १० नव्हे २० नव्हे तर तब्बल १०० पेक्षा अधिक जखमा आहेत. डॉक्टरांनी तिला अँटी रेबिज सिरम दिले आहे. तिची प्रकृती लक्षात घेता तिला बालरोग अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. ईएनटी तसेच सर्जरी विभागाचा सल्ला घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

महापालिकेकडून सतत मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच कुत्र्त्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रियाही केली जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरात कुत्र्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही बाब महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे

Stray dog attack
Bombay High Court: लिंगबदल केलेल्या विद्यार्थ्याला सुधारित पदवी द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे एसएनडीटीला आदेश

पकडलेले कुत्रे शहरालगतच्या वसाहतींत

शहराच्या विविध भागांतून महापालिकेचे पथक मोकाट कुत्रे पकडते, परंतु त्यांना ज्या भागातून पकडले, तेथे पुन्हा सोडले जात नाही. बहुतांश वेळा हे कुत्रे शहरालगतच्या वसाहतींमध्ये सोडले जातात. यात प्रामुख्याने नारेगाव, भावसिंगपुरा, हसूल, सातारा, देवळाई, छावणी, बजाज रुग्णालयाचा मागचा परिसर आणि जटवाडा या भागांचा समावेश आहे. परिसर अनोळखी असल्याने हे कुत्रे अधिक आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ले करत असल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news