Soybean Price Hike : सोयाबीनचे भाव वाढले,फायदा मात्र व्यापारी, शासनाचा

रेणापूर : 90 टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नाही
Soybean Price Hike
Soybean Price Hikepudhari photo
Published on
Updated on

विठ्ठल कटके

रेणापूर : मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल साडेतीनशे रुपयांची वाढ झाली आहे. सध्या 90 टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी व शासनाने आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या सोयाबीनलाच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सोयाबीनचे भाव वर्षभरात चार हजारांच्या वर गेले नाहीत. ते 2026 च्या मार्च पर्यंत कायम स्थिर होते. एप्रील - मे या दोन महिण्यात सोयाबीन प्रति क्विंटल दिड हजाराने वाढले. लहान व अल्पभुधारक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री केली आज अशा जवळपास 90 टक्के शेतकऱ्याकडे सोयाबीन उपलब्द नाही.

Soybean Price Hike
Renapur soybean rate : सोयाबीन, ज्वारी तेजीत; इतर धान्यांचे भाव स्थिर

बाजारात सध्या सोयाबीन प्रति क्विंटल 6 हजार आठशे रुपये दराने विक्री होत आहे. परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी तो व्यापाऱ्यांना व शासनाने खरेदी केलेल्या सोयाबीनलाच अधिक होण्याची शक्यता आहे. सोयाबीन बरोबरच ज्वारीच्या भावातही क्विंटल मागे दिड ते दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच तुर - 811 , तुर - लाल , तूर - पिंक , तुर - पांढरी , चना जाकी , चना विजय ,मुग , राजमा ब्राझील , राजमा वरूण , ज्वारी व करडी या धान्याचे भाव शंभर ते तीनशे रुपये प्रति क्विंटलने वाढल्याचे चित्र आहे.

यावर्षी अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांना फटका बसला. नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून गेल्या. 2021 - 22 नंतर सोयाबीनच्या भावात वाढच झाली नव्हती ते चार - साडेचार हजारांवरच स्थिरावले होते. सध्या मात्र त्यात तीनशे ते साडेतीनशे रुपयांची वाढ झाली आहे. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 328 रुपये जाहिर केला होता. त्या मानाने बाजारात सोयाबीनला तेवढा भाव मिळाला नाही.

Soybean Price Hike
गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता

एका क्विंटलमागे दीड हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशा शेतकऱ्यांना हमी भाव व बाजार भाव यातील फरकाची रक्कम देण्याची घोषणा सरकारने केली होती ती अद्याप पुर्ण झाली नाही. शेतीमालाचे उत्पादन कमी झाल्यावर त्यांचे भाव वाढतात असा शेतकऱ्यांचा समज असतो परंतु दरवर्षी त्याच्या उलट होतांना दिसत आहे. करडई हे तेलवर्गीय धान्य आहे. 2025 मध्ये करडईला साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता त्यानंतर त्यात वाढ झाली नाही. एक वर्षात तीन साडेतीन हजाराची घसरण झाली आहे.

  • एप्रील - मे 2026 च्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन प्रति क्विंटल - 6 , 350 रुपये होते सध्या 6 हजार 800 रुपये आहे, तुर - 7,560 होती सध्या 7 हजार 800 आहे , चना - 5,300 होता सध्या 5 हजार 700 आहे , मुग - 7 , 700 होता सध्या 7 , 800 आहे , उडीद- 6, 700 होता - 6,900 आहे , ज्वारी- 4,500 होती ती सध्या 4 हजार 700 आहे, करडई-5,8 80 होती तीही सध्या 5 हजार 600 आहे. करडईच्या भावात मोठी घसरण झाल्याचे तर सोयाबीन व इतर सर्वच धान्यांच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news