

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : वारकरी संप्रदायातील थोर संत श्री सावता माळी महाराज यांचा ७३० वा संजीवन समाधी सोहळा येथील सावता माळी महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संत सावता महाराज यांच्या समाधीचे उपस्थित महिला आणि पुरुषांनी दर्शन घेतले. दरम्यान ह.भ.प विनोदाचार्य गोविंद महाराज चाकूरकर यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.
याप्रसंगी बालाजी पाटील चाकूरकर, नगरसेवक विलासराव पाटील, नग नगरसेवक भागवत फुले, नगरसेवक नितीन रेड्डी, रवींद्र नीलकंठ, दिलीप पाटील आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस् वीतेसाठी प्रा दयानंद झांबरे, संजय क्षीरसागर, देविदास झांबरे, युवराज आगरकर, जिल्हाध्यक्ष आत्माराम डाके, सुधीर झांबरे, जीत माळी, अविनाश झांबरे, विठ्ठलप्रसाद झांबरे, प्रशांत झांबरे, नागनाथ झांबरे, कपिल डाके, राम डाके, ओम राऊत, बाळू झांबरे, संकेत बेंडके आदींनी परिश्रम घेतले.