Lumpy Disease : लातूर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव, १२ गावांत बाधा

४७ गुरांना लागण; प्रशासन सतर्क, उपाययोजना सुरू
Lumpy Disease
Lumpy Disease : लातूर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव, १२ गावांत बाधा File Photo
Published on
Updated on

Lumpy outbreak in Latur district, 12 villages affected

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर जिल्ह्यात गुरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव आढळला असून आतापर्यंत चार तालुक्यांतील १२ गावांमध्ये ४७ गुरांना त्याची लागण झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने बाधीत गुरांचे विलीगकरण करण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने शेतकरी व पशुपालकांना दिला आहे. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने शीघ्र कृती दल स्थापन केले आहे. विलगीकरण, औषधोपचार, बाह्य परोपजीवी नियंत्रण आणि डिसइन्फेक्शनबाबत स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Lumpy Disease
Agriculture Solar Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर

अहमदपूर तालुक्यातील वरवंटी, धसवाडी, कोंडगाव, ब्रह्मपुरी, शिंदगी या पाच गावांत. २६ गुरांपैकी पाच बरे झाले असून १९ गुरांवर उपचार असू आहेत गुरांचा मृत्यू झाला आहे. लातूर तालुक्यात बोरवटी, खुलगापूर, सलगरा या तीन गावात बाधीत तीन गुरांपैकी दोन बरे झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. उदगीर तालुक्यातील हेर, डोंगरशेळकी, देवर्जन या ३ गावांत प्रादुर्भाव. झाला असून ७ गुरांपैकी ३ बरे झाले असून ४ वर उपचार सुरू आहेत.

देवणी तालुक्यातील : अंबानगर गोशाळा येथे ११ गुरांवर, उपचार सुरू असून काही बरे झाले आहेत. जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनासाठी १,७६,५०० लसी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,५९,५०० लसीकरणासाठी वापर करण्यात आल्या आहेत. सध्या १७,००० लसी शिल्लक असून त्या तातडीने पशुपालकांच्या जनावरांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Lumpy Disease
Latur Political News : निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये जम्बो प्रवेश

जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन आजाराची माहिती गोळा केली जात आहे. परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी औषधांची फवारणी व विशेष उपाययोजना केली जात आहे. प्रत्येक बाधित गावात तत्काळ पोहोचून तपासणी, उपचार, नमुने गोळा करणे व विलगीकरणाच्या सूचना देण्यासाठी शीघ्र कृती दल सज्ज ठेवण्यात आले आहे.

सर्व संस्था प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लसीकरण मोहिमा, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर द्यावा. बाधित रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्याची व्यवस्था करावी.
राहुलकुमार मीना, सीईओ जिल्हा परिषद लातूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news