

Accused arrested from Nanded district with seven motorcycles
लातूर, पुढारी वृतसेवा लातूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या ०७मोटारसायकलींसह नांदेड मधील आराेपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इरबा उर्फ संभा पंढरीनाथ शिकारी, (वय २८ रा. लादगा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघड झाले आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचा तपास पथक करीत असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील रिंगरोडवरून नांदेड येथील रहिवासी असलेल्या उपरोक्त तरुणाला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्या कडील मोटारसायकल संदभनि विचारपूस केली असता काही दिवसापासून त्याने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दी मधून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.
नमूद आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या सात मोटार सायकली एकूण किंमत ०३ लाख ९५ हजार रुपयांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलिस अंमलदार युवराज गिरी प्रदीप स्वामी, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे गणेश साठे, काका बोचरे यांनी पार पाडली.