Latur News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सहदेवची विधानभवनाकडे कूच, खांद्यावर नांगर, ५०० किलोमीटर पायी प्रवास

अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे (वय ५०) हे विधानभवनाकडे खांद्यावर नांगर घेऊन पायी निघाले आहेत.
Latur News
Latur News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सहदेवची विधानभवनाकडे कूच, खांद्यावर नांगर, ५०० किलोमीटर पायी प्रवास File Photo
Published on
Updated on

Sahdev's 500-kilometer journey on foot for farmers' demands

गोरख भुसाळे

किनगाव : व्यवस्था अन निसर्गाच्या चक्रात अडकलेल्या बळीराजाला न्याय मिळावा. त्याच्या कष्टाचा आदर व्हावा, त्याच्या माथ्यावरील कर्जाचा डोंगर हटावा, मरणाचा विचार त्याच्या मनाला कधीही न शिवावा असे शेतकरी हितैषी धोरण सरकारने राबवावे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात या प्रांजळ उद्देशाने अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे (वय ५०) हे विधानभवनाकडे खांद्यावर नांगर घेऊन पायी निघाले आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता ते अहमदपूर मार्गस्थ झाले.

Latur News
Latur Farmer News | लातूरातील 'त्या' वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, जगण्याचा अधिकार मिळावा, रोजगार हमी योजना वर्ष २०२३ पासूनची थकीत रक्कम मिळावी, नाफेड अंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी फरक रक्कम मिळावी, शेतकरी सन्मान निधीत वाढ करावी अशा शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून हा शेतकरी मुंबापुरीस निधाला आहे, खांद्यावर नांगर, पाठीवर अंथरूण पांघरून, शिद्या साहित्याची बॅग अन मनात जिद्द घेऊन ते पायी विधानभवन गाठणार आहेत.

Latur News
Latur Crime News : चोरट्या वाळूसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसाला ५० किलोमीटर अंतर ते चालणार आहेत या गतीने आपण १० ते ११ दिवसांत विधानभवन गाठू असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. सरकारला अनेक निवेदन दिले. मात्र सरकार दखल घेत नसल्याने आता विधानभवन गाठायचे असा आपण निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी ते केजपर्यंत पोहोचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news