

25 lakh worth of stolen sand seized
लातूर, पुढारी वृत्तसेवा वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारा हयवा टिप्परसह २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी पिराजी समृत हाके, (वय ३२, रा. हुलेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड व विकास काशिनाथ क्षीरसागर, (रा. आडगाव, ता. लोहा जिल्हा नांदेड) यांच्याविरुध्द अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पथकाने मिळालेल्या माहितीवरून ३ जुलै रोजी रात्री अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोडवर सापळा लावून गौण खनिज वाळूची अवैध चोरटी वाहतूक करीत असलेल्या वाळूने भरलेल्या हायवा टिप्पर किंमत २५ लाख रुपये, त्यामध्ये विना पास परवाना चार ब्रास वाळू २० हजार रुपये असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला.
पुढील तपास अहमदपू पोलिस करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, सचिन धारेकर, मनोज खोसे, चंद्रकांत डांगे यांनी केली आहे.