Renapur Stray Dog Problem : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार ?

रेणापूरच्या नागरिकांचा सवाल
Renapur stray dogs menace
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार ?pudhari photo
Published on
Updated on

रेणापूर : रेणापूरच्या नगर पंचायतीने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तांसाठी काही महिन्यांपूर्वी टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली सदरचे टेंडर बीडच्या एका सोसायटीला मिळाले. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मोकाट व खरजुल्या कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली तातडीने असून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलेला आहे. गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचा सर्रास वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट व त्वचारोगाने त्रस्त झालेल्या कुत्र्यांची संख्या वरचेवर वाढत आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे यासारख्या आजार होत आहेत.

Renapur stray dogs menace
Renapur stray dogs menace : रेणापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

शहरातील मोकाट कुत्री पकडून त्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करणे, त्यांना पकडून काही दिवस बंदीस्त ठेवणे याबाबतचा ठेका बीडच्या एका सोसायटीला दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या सोसायटीकडून अद्याप कसलीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही. याबाबत नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरिक्षक महेमूद शेख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बीडच्या एका सोसायटीने रेणापूर शहरासह नगर पंचायत हद्दीतील मोकाट कुत्री पकडण्याची व त्यांचे लसीकरण करून निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे सांगितले.

Renapur stray dogs menace
Stray Dogs Attacks : मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा चिमुकल्यावर हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news