Latur News : पीक करपले; मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा

ई-पीक पाहणी, जिओ टॅगिंगसह विविध कागदपत्रांची अट; पंचनामा प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी
Latur News
Latur News : पीक करपले; मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिराfile photo
Published on: 
Updated on: 

Provision of various documents including e-peak inspection, geo tagging; Demand for simplification of Panchnama process

जयपाल ठाकूर

औसा : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना आता नुकसानभरपाईच्या पंचनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना त्यांची दमछाक होत आहे. ई-पीक पाहणी, जिओ टॅगिंग, ७/१२, ८-अ, आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक तसेच सामायिक क्षेत्र असल्यास संमतीपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Latur News
Latur Death : रेणापूरमध्ये डीपी दुरुस्तीवेळी ३५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

औसा तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद यासह विविध खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके शेतातच वाळून गेली असून उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता मावळली आहे. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी पंचनाम्यासाठीच्या कागदपत्रांमुळे प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Latur News
Latur News : सीईआयआरच्या मदतीने ५१ हरवलेले मोबाईल शोधले

ई-पीक पाहणी झालेली असली तरी त्याची नोंद, जिओ टॅगिंग आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता याबाबत अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना संमतीपत्राची अतिरिक्त अडचण येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती द्यावी, गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांना अवगत करावे आणि प्रत्यक्ष शेतातील नुकसानीच्या आधारे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. शेतकरी अरब तालीब, नागरसोगा आणि महादेव फडणीस, जवळगा पोमदेवी यांनी प्रशासनाने कागदपत्रांच्या अटी सुलभ करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली.

पंचनाम्यासाठी कागदपत्रांचा गुंता

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणी, जिओ टॅगिंग, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. सामायिक क्षेत्र असल्यास संबंधित शेतकऱ्यांचे संमतीपत्रही आवश्यक आहे. कागदपत्रांबाबत स्पष्ट माहिती नसल्याने अनेक शेतकरी संभ्रमात आहेत.

'बांधावरच पंचनामा करा'

पावसाअभावी पिके पूर्णपणे करपली असून अनेक ठिकाणी शेतात उभे पीकही शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत कागदपत्रांच्या त्रुटींमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत. महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, पंचनाम्याची प्रक्रिया सुलभ करावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल, याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news