Latur News : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी प्राचार्यावर पोक्सो

बशीर शेखविरुद्ध गुन्हा, कॅम्पसवर संतप्त पालक महिला व संघटनांचा मोर्चा
Latur News
Latur News : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी प्राचार्यावर पोक्सोfile photo
Published on: 
Updated on: 

POCSO case against principal for molesting minor student

लातूर, पुढारी वृत्तसेवाः शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या र्व विनयभंगप्रकरणी प्राचार्य बशीर शेख याच्याविरुद्ध व पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur News
Latur News : पीक करपले; मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी विद्यार्थिनीला कॅम्पसमधील एका खोलीत बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आली आहेत. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना, महिला, पालक व कार्यकर्त्यांनी आदर्शकॅम्पसवर मोर्चा काढला. संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चादरम्यान संस्थेच्या नामफलकावर शाईफेक करण्यात आली. तसेच वसवाडी-बार्शी रोड परिसरातील संस्थेच्या शाखेच्या इमारतीच्या काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

Latur News
Latur Crime : उदगीरमध्ये अवैध सावकारीचा पर्दाफाश ; कोरे बॉण्ड, कोरे चेक आणि व्याजाच्या वह्यांसह मोठा साठा जप्त!

न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार : डॉ. अर्चना पाटील

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेच्या नातेवाईकांची भेट घेतली. आरोपीला शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा धीर त्यांनी दिला. दरम्यान, डॉ. पाटीलयांनी लातूर जिल्हा वकील मंडळाची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये, अशी विनंती केली. याबाबत आज होणाऱ्या लातूर वकील मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news