Online Fertilizer Booking Fails-ऑनलाइन खत बुकिंगचा फज्जा; शेतकरी-दुकानदारांत शाब्दिक बाचाबाची

अहमदपूर : सर्व्हर, इंटरनेट व आधार पडताळणीच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप
Online Fertilizer Booking Fails
Online Fertilizer Booking Fails
Published on
Updated on

मारोती बुद्रुक पाटील

अहमदपूर : खतांची आगाऊ बुकिंग करून शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन प्रणालीला अहमदपूर तालुक्यात तांत्रिक अडचणींचा फटका बसत आहे. अॅपमधील किचकट प्रक्रिया, सव्र्व्हर डाऊन होणे आणि आधार पडताळणीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, खत मिळण्यावरून शेतकरी आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे.

खतांची वितरण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कृषी विभागाने 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायड़ार सेल' ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोबाईलवरून खताची आगाऊ बुकिंग करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित अॅप डाउनलोड करून आधार क्रमांक किंवा शेतकरी ओळखपत्राद्वारे ओळख पडताळणी करावी लागते. ओटीपी अथवा ई-केवायसीनंतर पिकाची नोंद करून आवश्यक खताचे प्रमाण निवडावे लागते. त्यानंतर परिसरातील उपलब्ध साठ्याच्या परवानाधारक विक्रेत्याची निवड करून बुकिंग करता येते. बुकिंगनंतर मिळणारा टोकन क्रमांक किंवा क्यूआर कोड दाखवून तीन दिवसांच्या आत खत खरेदी करणे बंधनकारक आहे.

Online Fertilizer Booking Fails
Latur News : पावसाची हुलकावणी, ढगाळ वातावरणामुळे अळीचा वाढला प्रादुर्भाव; उसाची वाढ खुंटली

शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागू नये आणि वेळेत खते मिळावीत, हा या प्रणालीमागील उद्देश आहे. मात्र ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, सव्र्व्हर डाऊन होणे, आधार पडताळणी न होणे तसेच अॅपवरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना बुकिंग करताना अडथळे येत आहेत. आगाऊ बुकिंग करूनही ऐनवेळी खत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. टोकन मिळण्यात किंवा विक्रेत्याकडे त्याची नोंद होण्यात अडचणी येत असल्याने अहमदपूरमध्ये शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

दख्यान, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अडचण आल्यास संदीप आयनुले यांच्याशी ९५२७०७७०५४ आणि यशपाल सातपुते यांच्याशी ७७०९६८८२३७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Online Fertilizer Booking Fails
DJ Noise Pollution Latur : ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील ४ मंडळे कारवाईच्या रडारवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news