DJ Noise Pollution Latur : ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील ४ मंडळे कारवाईच्या रडारवर

ध्वनी मोजणी अहवाल, फोटो-व्हिडिओ व अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे
DJ
DJPudhari
Published on
Updated on

उदगीर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी उदगीर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले. आठ जयंती मंडळांपैकी चार मंडळांचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डीजे चालक व ऑपरेटर यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

DJ
Latur News : पावसाची हुलकावणी, ढगाळ वातावरणामुळे अळीचा वाढला प्रादुर्भाव; उसाची वाढ खुंटली

कॉर्नर चौकात ध्वनी तीव्रता मोजणी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत चर्च रोड, फुलेनगर पश्चिम, किल्ला गल्ली आणि निडेबन वेस येथील मंडळांकडून नियमभंग झाल्याचे निष्पन्न झाले. मिरवणुकीपूर्वी नियमांचे पालन करण्याबाबत सूचना व हमीपत्र घेण्यात आले होते. आता ध्वनी मोजणी अहवाल, फोटो-व्हिडिओ व अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

DJ
Latur News : अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमुक्ती योजना; बॅनरवर मात्र त्यांचाच फोटो गायब!

डीजेचा वापर करू नये’ सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि परवानगीतील अटींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उदगीर शहर पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news