

Municipal corporation elections; the commissioner conducted a surprise inspection of the static surveillance teams
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही बाजूंनी स्थापन करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथकांसह आचारसंहिता कक्षाला मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
निवडणुकीच्या काळात रोख रक्कम, मद्य तसेच शस्त्रांची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी स्थिर निगराणी पथकाची स्थापना करण्यात येते. लातूर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा रस्त्यावर वासनगाव जवळ, वार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्त्यावर बोरवटी जवळ, नांदेड रस्त्यावर शेतकी शाळेजवळ तसेच बाभळगाव रस्त्यावर निगराणी पथके कार्यरत आहेत.
प्रच ाराची सुरुवात होत असल्याने आयुक्त श्रीमती मानसी यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार वाहनांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार गणेश सरोदे, विस्तार अधिकारी निलेश सोमाणी, झोनल अधिकारी रवी कांबळे, लक्ष्मण जाधव यांची उपस्थिती होती. गांधी चौक परिसरात स्थापित करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षालाही श्रीमती मानसी यांनी भेट दिली.
तेथे आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी आम्रपाली कसोडेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, विस्तार अधिकारी बालाजी पोतदार, प्रदीप बोंबले, विष्णु शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. आचारसंहिता कक्ष, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागासोबत समन्वय साधून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.