

In the Latur Municipal Corporation election battle, there are 323 candidates; 304 have withdrawn.
लातूर, पुढारी वृत्तसेवा :
लातूर शहर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी दाखल झालेल्या ६२७ उमेदवारी अर्जापैकी ३०६ जणांनी आपली उमेदवारी अखेरच्या दिवसापर्यंत मागे घेतली. त्यामुळे महापालिकेच्या मैदानात आता ३२१ उमेदवार लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आता भाजप ७०, काँग्रेस ६५, राष्ट्रवादी काँग्रेस ५२, शिवसेना ७, वंचित बहुजन आघाडी ५, राष्ट्रवादी काँग्रेस शप १५, शिवसेना ठाकरे ६, आम आदमी पार्टी ८, बहुजन समाज पार्टी ४, २, स्वराज्य शक्ती सेना ३, समाजवादी पार्टी १ व उमेदवार निवडणूक एमआयएम ९राष्ट्रीय समाज पार्टी महाराष्ट्र विकास आघाडी ३, अपक्ष ७४ असे एकूण ३२३ रिंगणात उतरले आहेत.
लातूर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ६२७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. भाजपसह काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या तिकीट न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती तसेच घरातील एका सदस्याला उमेदवारी दिली असतानाही अन्य सदस्याने दुसऱ्या प्रभागातून अथवा त्याच प्रभागातून सुरक्षिततेसाठी उमेदवारी दाखल केलेली होती.
त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण मोठे दिसत होते. पंधरा ते वीस जणांनी बंडखोरी केल्याचे दिसून आले व आज काही नाराज कार्यकत्यांनी सोशल मीडियामधून आपल्याच पक्षांच्या नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. २ जा-नेवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले आणि दुपारी तीन वाजेपर्यंत अनेकांनी माघार घेतली.
यामध्ये भाजपाचे शैलेश गोजमगुंडे यांनी प्रभाग एक मधून, दिग्विजय काथवटे, शशिकला गोमचाळे, देवानंद साळुंखे, पुनीत पाटील, गणेश हेड्डा, सुधीर धुत्तेकर, मनोज घोरपडे, सुनील मलवाड, प्रदीप मोरे आदींनी उमेदवारी मागे घेतली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधीलही अनेकांनी माघार घेतली. यामध्ये मकरंद सावे, हंसराज जाधव, रेहाना बासले, विश्वनाथ अल्टे आदींचा समावेश आहे.