

Matka gang in Udgir taluk from Latur district to Tadipar
लातूर, पुढारी वृतसेवा : उदगीर तालुक्यातील मटका गँगच्या सात जणांना अनुक्रमे दोघांना तीन सहा जणांना दोन महिन्यासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अहमद सुरज शेख (रा. वाढवणा बु.), सोहेल मुजमील शेख (रा.हाळी), क्रांतीकुमार शिवाजी जोंधळे (रा. वाढवणा बु.), विक्रम विनोद शिंदे (रा.हाळी), फिरोज चॉदसाब शेख (रा. वाढवणा), अजय अनिल कज्जेवाड (रा. वाढवणा बु.), अलिम आयुबसाब डांगे (रा. वाढवणा बु.) व तुकाराम रामकिशन पुंड (रा. वाढवणा बु.) अशी त्यांची नावे आहेत.
लातूर जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु काही मटका जुगार चालविणाऱ्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नाही. ते लपूनछपून मटका जुगार चालवीत असताना परत मिळून आले.
त्यांच्या अशा कृत्यामुळे समाजातील गोरगरीब जनता, मजदर वर्ग झटपट पैसे कमविण्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. जुगारांमध्ये पैसे हारल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक जनामध्ये नैराश्य निर्माण होऊन ते व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही मटका जुगार चालविणारे लोक त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही परत लपून-छपून मटका जुगार चालवीत आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक तांबे यांनी जिल्ह्यातील मटका जुगार चालवणाऱ्या वर हद्दप-ारची कार्यवाही करण्याकरिता ठाणे प्रभारींना आदेशित केले होते.
त्यावरून उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील मटका जुगार चालवणाऱ्या उपरोक्त व्यक्तींविरुध्द उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस गायकवाड यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उदगीरचे उपविभागीय दंडाधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे पाठविला होता. पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व वाढवना पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी केला होता. त्यावर सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी अनुक्रमांक एक ते दोन यांना तीन महिन्यासाठी तर अनुक्रमांक तीन ते आठ यांना दोन महिन्यासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) ची कार्यवाही केली आहे.