

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात 8 टीपीडी क्षमतेच्या म्हणजे आठ मेट्रिक टन प्रति दिवस कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मांजरा कारखान्यातून आता दररोज आठ मेट्रिक टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती होणार असून सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केले.
दिलीपराव देशमुख म्हणाले की, मांजरा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. ऊसतोडणीचे 100 टक्के हार्वेस्टरद्वारे नियोजन करून कारखान्याने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिलेल्या विचारधारेचा मार्गदर्शक ठेवून मांजरा परिवाराची वाटचाल सुरू आहे.
सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले असून, कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत, असे सांगून भविष्यात अधिकपणे चांगल काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे यांनी प्रास्ताविकात चालू गळीत हंगामाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात लातूर शहर व तालुक्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित विजयी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यात लातूर शहराच्या नूतन महापौर, स्थायी समितीचे सभापती, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, रेणाचे अनंतराव ठाकूर-देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव किरण जाधव, स्थाई मनपा समिती सभापती सचिन बंडापल्ले, इंदिरा सूतगिरणी अध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संत शिरोमारुती महाराज कारखाना उपाध्यक्ष सचिन पाटील, रेणा कारखाना उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण उपस्थित होते.
राज प्रोसेसचे एमडी अनिलराज पिसे, अमर वडगावकर, रिजवान अन्सारी, मयूर नीळकंठ, रोहित गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे, श्रीकांत माने, महादेव मस्के, अश्विनी शिंदे, दीपाली आदमाने, राजश्री देशमुख, भागीरथी पाटील, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ गवळी, अमोल देडे, अक्षय देशमुख, सत्यनारायण पाटील, विलास उफाडे, किशोर जवंजाळे, शरयू गायकवाड, दीपाली कराड, सुनंदा स्वामी पूजा ढगे, तनुजा चव्हाण, प्रिया उफाडे, पूजा जाधव, शिवानी शिंदे आदींसह कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक पंडित देसाई,कारखान्याचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार कैलास पाटील यांनी मानले.