Tax collection camp : अंतिम नोटीस बजावताच लातूरकरांनी भरले ४ कोटी !

मनपाचे विशेष मालमत्ता कर वसुली शिबीर : एक दिवसाची मुदतवाढ
Tax collection camp
Tax collection camp : अंतिम नोटीस बजावताच लातूरकरांनी भरले ४ कोटी !File Photo
Published on
Updated on

Laturkars paid Rs 4 crore as soon as the final notice was issued!

लातूर पुढारी वृत्तसेवा : लातूर शहरातील हजारो करदात्यांकडे कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासक आयुक्त मानसी मीना यांनी थकबाकीदार करदात्यांना व्याजात ८० टक्के सवलत जाहीर करून ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कराचा भरणा करण्याबाबत अंतिम नोटीस बजावली होती. या नोटीसमुळे थकबाकीदारांनी रविवारी सायंकाळपर्यंत ३ कोटी ६० लाखांचा मालमत्ता कर भरला. करदात्यांची गर्दी असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.

Tax collection camp
Latur News : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा

लातूर शहर महानगरपालिकेत साधारण एक लाखाच्या जवळपास मालमत्ताधारकांची नोंद आहे. ए बी सी डी या चार झोन अंतर्गत मालमत्ता विभागण्यात आले असून या झोनअंतर्गतच कर वसुली केली जाते. चालू आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून ते आजतागायत ४१ कोटी ५० लाख रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. मात्र महापालिकेचा वार्षिक मालमत्ता कर दीडशे कोटींच्या घरात असल्याने व आठ महिन्यांत ५० टक्केही वसुली न झाल्यामुळे महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मानसी मीना यांनी मालमत्ता कर वसुलीचे झोननिहाय नियोजन केले आणि थकबाकीदार मालमत्ताधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या प्रकरण ११ कलम १२८ (१) अन्वये मागणी देयक देण्यात आले. मात्र मालमत्ता करदात्यांकडून कराचा भरणा झाला नाही. त्यामुळे मालमत्ता धारकांना सात नोव्हेंबर २०२५ रोजी थकबाकीदार मालमत्ता धारकांना अंतिम नोटीस बजावण्यात आल्या.

३० नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात विशेष कर बसुली शिबिर आयोजित करण्यात आले असून या दिवशी थकीत कराचा भरणा करावा अन्यथा एक डिसेंबर २०२५ रोजी पासून मनपा अधिनियम १२८ (३), (४) नुसार मालमत्तेची जप्ती अथवा पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन तोडण्यात येईल अशी कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आज रविवारी महापालिकेच्या आवारात पेंडॉल उभारून सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी झोननिहाय टेवल व्यवस्था केली होती. प्रत्येक टेबलवर कॅश व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

Tax collection camp
Latur Crime News : जेवण हाताने वाढून घ्या म्हणाल्याचा राग; पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने केला खून

सकाळपासूनच करदात्यांनी गर्दी सुरू केली. सकाळी दहा वाजता आयुक्त मानसी मीना, उपयुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी कर भरणाऱ्या करदात्यांचे स्वागत केले. सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत करदात्यांनी सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता. ए झोनमध्ये १.३५ कोटी, बी झोनमध्ये १.१५, सी झोनमध्ये ६० लाख तर डी झोन मध्ये ५० लाख रुपये कर वसूल झाला होता. सायंकाळी करदात्यांची आणखी गर्दी होती.

त्यामुळे सुमारे ४० ते ५० लाख रुपये कर वसुली होईल असा अंदाज वर्तवला गेला. तसेच व्याजात ८० टक्के सवलत जाहीर केली असल्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत मुदत गृहीत धरून वसुली मोहिमेचे कामकाज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मनपाचे कर वसुली अधीक्षक प्रतीक मुसांडे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

यावेळी झोनल अधिकारी रवी कांबळे, संतोष लाडलापुरे, समाधान सूर्यवंशी, विजय राजुरे यांच्यासह रूकमानंद वडगावे, महेश शर्मा, गोपी साठे, कलीम शेख, नाना बंडगर, बालाजी शिंदे, गणेश आदमाने, अंगद शिंदे यांच्यासह कर निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, बिल कलेक्टर आदींनी कर वसुलीस सहकार्य केले.

धडक कारवाईसाठी आठ पथकांची नियुक्ती

लातूर शहरात थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी एक डिसेंबरपासून मालमत्ता जप्ती व नळ तोडणीची धडक कारवाई राबविण्यात येणार आहे. प्रत्येक झोनमध्ये दोन पथक नियुक्त करण्यात आले असून एकेका पथकामध्ये आठ ते दहा वसुली अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती मनपाचे कर वसुली अधीक्षक प्रतीक मुसांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news