

District Collector reviews election work
रेणापूर, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रेणापूर नगर पंचायतीच्या सवित्रिक निवडणूकीच्या निवडणूक कामाचा आढावा घेतला. स्ट्राँग रूम व श्रीराम विद्यालय येथील मतदान केंद्रास भेट देऊन तेथील सोयी सुविधांची माहिती घेतली व कांही महत्वाच्या सूचना केल्या. नागरीकांनी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.
या ठिकाणी गावातील नागरिक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मतदार जागृती कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थोरात, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन भुजबळ , जिल्हा प्रशासन अधिकारी अजितकुमार ढोके, गटविकास अधिकारी सुमित जाधव, डीवायएसपी चौधर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, स्वीप पथक प्रमूख कृष्णा भराडीया आदींची उपस्थिती होती.
महादेव बन यांनी मतदार जागृतीचे गीत सादर केले अमृतेश्वर स्वामी यांनी सर्व मतदारांना प्रतिज्ञा दिली. मतदान हा सर्वश्रेष्ठ अधिकार असून निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे सर्व नागरिक बंधू-भगिनींनी शंभर टक्के मतदान करून लोकशाही यशस्वी करण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे सांगून नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मतदार जागृती पथकाने केलेल्या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.
त्यांनी नागरीक महिला मतदार व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मतदार जागृतीचे फलक दिसत होते मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. सुंदर रांगोळी व शंभर टक्के मतदान करण्याच्या संकल्पमुळे व मतदार जागृती पथकाच्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वाडी वस्ती तांडा येथील जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मतदार जागृती पथकाचे सदस्य अमृतेश्वर स्वामी यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीप सहाय्यक पथक प्रमूख सुदर्शन लहाने, समन्वयक संजय देशपांडे, प्राचार्य सिध्द-`श्वर मामडगे, पर्यवेक्षक अनिल कुटवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतिष मोरे, स्वीप सदस्य मंगेश सुवर्णकार, अमृतेश्वर स्वामी, महादेव बन, सुरेखा चंदेले, प्रा भरत धायगुडे श्रीराम विद्यालय रेणापूर व नगर पंचायत रेणापूरच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.