Latur News : धनेगाव बॅरेजची दुरवस्था; भविष्यात अनर्थ घडण्याची शक्यता, दारे उचलेनात

शेतकऱ्यांचे हित दृष्टीक्षेपात ठेवून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या धनेगाव बॅरेजची फार मोठी दुरावस्था झाली आहे.
Latur News
Latur News : धनेगाव बॅरेजची दुरवस्था; भविष्यात अनर्थ घडण्याची शक्यता, दारे उचलेनातFile Photo
Published on
Updated on

Latur News Poor condition of Dhanegaon Barrage

सतीश बिरादार

देवणी : शेतकऱ्यांचे हित दृष्टीक्षेपात ठेवून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या धनेगाव बॅरेजची फार मोठी दुरावस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे..

Latur News
Latur earthquake: लातूर जिल्ह्यातील बोरवटीला भूकंपाचे धक्के

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबकता यावी म्हणून २००५ साली धनेगाव बॅरेज बंधाऱ्यांची उभारणी संकल्पना पुर्णतःस आणली. बॅरेज बंधाऱ्यांच्या पाण्याने या भागात हरीतक्रांती झाली. पण गेल्या काही वर्षात या बॅरेज बंधाऱ्यांची दुरावस्था पहावयास मिळत आहे. या बंधाऱ्यांवर कंत्राट कर्मचारी असतात. त्यावर प्रशासनाचा अंकुश नाही.

बंधारा स्थळावर गवत, काटेरी झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे साप विंचु असे सरपटणारे प्राणी आढळतात. शिवाय पाळुवर मोठमोठाले झाडे वाढल्याने पाळुला धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही.

Latur News
Latur News : मांजरेच्या पुरात अडकलेल्या वानरांना मिळाली फळे

बंधाऱ्यांवर शिवुरच्या बाजुने गेट नसल्याने कोणीही प्रवेश करु शकतात. काटेरी फाटे टाकुन रस्ता बंद केला आहे. बंधारा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. काटेरी झुडपे गवत काढुनी पाळुवरील झाडे काढावीत. चांगल्या झाडांची लागवड करुन बगीचा बनवावा. शिवाय सतत चोरीला जाणाऱ्या साहित्याची राखण करावी यासाठी संबंधित विभागाकडून लक्ष देणे गरजेचे आहे.

दिवेही बंदच... दारे उचलेनात

रात्री अपरात्री पाणी कमी अधिक झाले किंवा दारे सोडणे उचलण्यासाठी बसविण्यात आलेले दिवे बंदच आहे. त्यामुळे काळाकुट्ट अंधार पहावयास मिळतो. तर सतत दार उचलण्यासाठी अडचण येतअसते. दारे नादुरुस्त असल्याने पाणी तुंबुन वरच्या शेतात पसरत आहे. ७ नंबरचे गेट कायमस्वरूपी बंदच असल्याने भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक पोते मासे... पाचशेचा दर

बंधाऱ्याचे दार बंद केले की मासे सापडतात. यासाठी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासे पकडण्यासाठी दार बंद करण्यास सांगितले जाते. त्यासाठी एक पोते मासे जमा झाल्यास त्यांनां पाचशे रुपये दिले जाते. मासे पकडण्यासाठी लोकांची गर्दी पहावयास मिळते. कहर म्हणजे दोरी बांधून मासेमारी करणारे बॅरेजवरुन खाली उतरतात ही जोखीम फार मोठी आहे. याचा बंदोबस्त पाटबंधारे विभागाने करावा अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news