

लातूर: आज शुक्रवारी (दि.26) साधारणपणे सकाळी 6.30 वाजेदरम्यान लातूर शहरानजिक असलेल्या लातूर तालुक्यातील बोरवटी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने यास दुजोरा दिला आहे.
सुमारे 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे त्यांनी कळवले आहे. 23 सप्टेंबर रोजी मुरुड अकोला, 24 सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातील हासोरी , बडूर, उस्तुरी या गावात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सदरील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.