Latur News : जीआर नको, खात्यावर मदत द्या!; निलंग्यात काँग्रेसने केली दुष्काळी जीआरची होळी

दुष्काळी परिस्थिती जाहीर करणारा शासन निर्णय काढल्यानंतरही त्यातून प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या वतीने शनिवारी निलंग्यात या जीआरची होळी करण्यात आली.
Latur News
Latur News : जीआर नको, खात्यावर मदत द्या!; निलंग्यात काँग्रेसने केली दुष्काळी जीआरची होळीfile photo
Published on: 
Updated on: 

Latur News: Congress burns drought-related Government GR in Nilanga

निलंगा, पुढारी वृत्तसेवा: पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे निलंगा तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करणारा शासन निर्णय काढल्यानंतरही त्यातून प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या वतीने शनिवारी निलंग्यात या जीआरची होळी करण्यात आली. शासनाने कागदी घोषणा न करता दुष्काळग्रस्तांना तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

Latur News
Latur Politics | ‘वेळ बदलली म्हणून इतिहास बदलत नाही’, आमदाराच्या बॅनरवरून सहकार मंत्र्यांचा फोटो गायब; समर्थकांचा सोशल मीडियावर संताप

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निलंगा तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटा बरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने मदतीसाठी विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, बाधित क्षेत्रातील पिकांचे अचूक पंचनामे करावेत, ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Latur News
Latur News : सणांचा आनंद सोडून कर्तव्य बजावले; खाकीतील योद्ध्यांचा झाला सन्मान !

शासनाने दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना तातडीने लागू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, सुधाकर पाटील, अजित माने, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news