

Abandoned the joy of festivals and performed duty; Warriors in khaki were honored
शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : सण-उत्सव म्हटले की प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण असते; मात्र गणेशोत्सव, बैलपोळा आणि ईदच्या काळात स्वतःच्या कुटुंबाचा आनंद बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या होमगार्ड्सच्या कर्तव्यनिष्ठेला यंदा अनोखी दाद मिळाली. शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय जाधव यांनी कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड्सचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते मिळालेल्या या सन्मानाने अनेक होमगार्ड्स भावुक झाले.
गणेशोत्सवापासून बैलपोळा आणि ईदपर्यंत विविध सणांच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड्सनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस सेवा बजावली. स्वतःच्या कुटुंबीयांपासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांच्या कामाची दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
आजवर आमचा असा मानसन्मान कोणीही केला नव्हता, अशी भावना व्यक्त करत काही होमगार्ड्सनी डीवायएसपी अक्षय जाधव यांचे आभार मानले. आपल्या कामाची वरिष्ठांनी घेतलेली दखल हीच मोठी पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन अंबादास पाटील यांनी केले. पो. हे. कॉ. गौतम घाडगे यांनी आभार मानले.
माणुसकीची जाणीव
मानले. आपल्या कामाची वरिष्ठांनी घेतलेली दखल हीच मोठी पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन अंबादास पाटील यांनी केले. पो. हे. कॉ. गौतम घाडगे यांनी आभार मानले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीसोबतच पोलिस दलातील प्रत्येक घटकाच्या योगदानाची दखल घेणे महत्त्वाचे आहे, या भावनेतून हा गौरव करण्यात आला. होमगार्ड्सच्या कामाचे कौतुक झाल्याने त्यांच्या मनोबलात वाढ झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही डीवायएसपी जाधव यांनी आभार मानले. विविध सण-उत्सवांच्या काळात पोलिस दलासोबत खांद्याला खांदा लावून सेवा बजावणाऱ्या होमगार्ड्सचा झालेला हा सन्मान शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात चर्चेचा विषय ठरला.