Latur Politics | ‘वेळ बदलली म्हणून इतिहास बदलत नाही’, आमदाराच्या बॅनरवरून सहकार मंत्र्यांचा फोटो गायब; समर्थकांचा सोशल मीडियावर संताप

जुन्या राजकीय संबंधांची आठवण करून देत टीका; आमदार बनसोडे समर्थकांकडून ‘आय सपोर्ट संजय बनसोडे’ पोस्टचा भडका
Sanjay Bansode vs Babasaheb Patil
Babasaheb Patil Sanjay BansodePudhari
Published on: 
Updated on: 

Sanjay Bansode vs Babasaheb Patil

संग्राम वाघमारे

चाकूर : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारचे आभार मानणारे आमदार संजय बनसोडे यांचे बॅनर चर्चेत आले असतानाच, या बॅनरवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या मुद्द्यावरून सहकार मंत्र्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतल्याने बॅनरवरील फोटोचा विषय आता राजकीय वादाचे कारण ठरत आहे.

‘वेळ बदलली म्हणून इतिहास बदलत नाही!’ या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. या पोस्टमधून आमदार संजय बनसोडे यांच्या जुन्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत, त्यांच्या राजकीय वाटचालीत ज्यांनी साथ दिली, मदत केली आणि विश्वास दाखवला, त्यांची आजच्या राजकीय परिस्थितीत आठवण ठेवली जात आहे का, असा अप्रत्यक्ष सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Sanjay Bansode vs Babasaheb Patil
Latur Crime News : कुंडली दोष दूर करण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार

‘पद मोठे झाले म्हणून कालच्या संघर्षातील माणसे विसरता येत नाहीत’, ‘कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत पद मिळाल्यानंतरही कायम राहायला हवी’, तसेच ‘उपकार विसरले म्हणून उपकार करणारे विसरत नाहीत’, अशा आशयाच्या पोस्टमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एका बॅनरवरील फोटोच्या अनुपस्थितीला जुन्या राजकीय संबंधांच्या संदर्भाची किनार मिळाली आहे.

फोटोचा विषय की जुन्या नाराजीला वाट?

एखाद्या बॅनरवर कोणाचा फोटो असावा किंवा नसावा, हा आयोजकांचा निर्णय असतो. मात्र, संबंधित नेत्यांमध्ये पूर्वी राजकीय जवळीक आणि परस्पर सहकार्याची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर फोटो नसल्याने समर्थकांकडून त्याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.

या पोस्टमुळे ‘राजकीय समीकरणे बदलली आहेत का?’, ‘जुनी राजकीय जवळीक आता केवळ इतिहास ठरली आहे का?’ आणि ‘या वादाचा आगामी राजकारणावर परिणाम होणार का?’ यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sanjay Bansode vs Babasaheb Patil
Latur ZP Teachers Society Meeting| जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा ठरली वादळी, सभासदांच्या प्रश्नांवरून गोंधळ

विशेष म्हणजे, केवळ एका बॅनरवरील फोटोच्या अनुपस्थितीवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून सुरू असलेल्या पोस्ट आणि प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, संबंधित नेते या प्रकारावर काय भूमिका मांडतात, समर्थकांचा सोशल मीडिया वाद पुढे किती वाढतो आणि दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा संवादाची शक्यता निर्माण होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘इतिहास विसरला म्हणून इतिहास बदलत नाही... आणि उपकार विसरले म्हणून उपकार करणारेही विसरत नाहीत!’ या आशयाच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, एका बॅनरवरील फोटोने दोन राजकीय गटांमधील संबंधांबाबत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

Sanjay Bansode vs Babasaheb Patil
Devendra Fadnavis Latur visit : देवाभाऊंनी शब्द पाळला, शिवेंद्रबाबांनी पालकत्व निभावले

‘आय सपोर्ट संजय बनसोडे’ पोस्टचा ट्रेंड

‘वेळ बदलली म्हणून इतिहास बदलत नाही’, असे म्हणत जुन्या राजकीय उपकारांची आठवण करून देणाऱ्या सहकार मंत्र्यांच्या समर्थकांच्या पोस्टला आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले आहे. ‘आय सपोर्ट संजय बनसोडे’ अशा आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या समर्थकांमधील सोशल मीडिया वाद चांगलाच रंगला आहे. या वादावर पडदा कोण आणि कसा टाकणार, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news