

विठ्ठल कटके
Latur Flowers news
रेणापूर: गेल्या दोन तीन महिन्यांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे यावर्षी ऐन गणेशोत्सवात फुलशेतीवर मोठे संकट आले असून फुलांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्यामुळे नैसर्गिक फुलांच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे या फुलांबरोबरच नैसर्गिक फुलांसारखी दिसणा-या आणि जास्त काळ टिकणाऱ्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांनाही तेवढीच मागणी होत आहे.
श्री गणेशोत्सव, महालक्ष्मी व दसरा - दिवाळीच्या सणाला पुजेसाठी व सजावट करण्यासाठी विविधरंगी बेरंगी नैसर्गिक फुलांना मोठी मागणी असते. अशा फुलांची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. या फुलशेतीतून शेतकन्यांना बच्चापैकी उत्पन्न मिळत असते. याचा सारासार विचार करूनच शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती, जरबेरा, स्टर, निशिगधा, गुलछडी, लिलीवन, जुई आदी फुलांची लागवड करीत असतात. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक फुलांचे उत्पादन सुरू होत असते. ग्रामीण भागातून पुणे, मुंबई, हैदराबाद व इतर ठिकणच्या बाजारपेठेत
अनेक शेतकरी कर्ज काढून फुलशेती करीत असतात. अशा फुलशेतीवर कवी निसर्ग कोपतो तर कधी बाजारात भाव मिळत नाही. प्लास्टिकच्या फुलांनी बाजरपेठा काबीज केल्यामुळे खऱ्या फुलांचा सुगंध आता कमी होत चालला आहे. फुलशेती कमी होत असल्यामुळे नैसर्गिक जैविक चक्र अडचणीत येत आहे. नैसर्गिक फुलातूनच मध उत्पादनाला चालना मिळत असते. फुलशेती कमी झाल्याने मधमाशांची संख्याही रोडावत चालली आहे.
नैसर्गिक फुलांना मोठी मागणी असते. या वर्षी पावसामुळे नैसर्गिक फुलांच्या उत्पादनात घट होऊन त्यांची मोठी नासाडी झाली त्यामुळे शहरी भागात नैसर्गिक फुलांची आवक म्हणावी तशी झाली नाही, असे शेतकरी सांगतात. यावर्षी सततच्या पावसामुळे फुलशेती तोट्यात आली असून ३० ते ४० टके फुलांचे उत्पादन घटले आहे. बाजारात नैसर्गिक फुलांची आवक घटल्यामुळे फुलांचे भाव गतवर्षीच्या तुलनेत दोन अडीच पटीने बावलेले आहेत.
सततच्या पावसामुळे फुलांची नासाडी झाली ती वेळेवर तोडता आली नाहीत. काही फुलांगर रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सांगतात, मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्यामुळे बाजारात गुलाबाच्या वीस फुलांच्या जुडीला १८० ते २०० रुपये दर होता. यासोबतच झेंडू प्रति किलो १५० ते १८० रुपये, शेवंती ३०० ते ३५० प्रति किलो दर होता. तर प्लास्टिक फुलांच्या माळेला २०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत.