संग्राम वाघमारे
latur bothi lake news
चाकूर : तालुक्यात अनेक भागांत २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे चाकूरकरांची तहान भागवणाऱ्या बोथी तलावातील पाणी सांडव्याबाहेर वाहू लागल्याने चाकूरसह अन्य सहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी सुटला आहे.
चाकूर तालुक्यात मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील विविध भागांत पाणीच पाणी झाले आहे. त्या पावसाने छोटी छोटी तलाव, नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होऊन शेतीपूरक पाणी झाल्याने सध्यातरी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. चाकूर तालुक्यात आतापर्यंत ६२२.०३ मि.मी. पाऊस झाला आहे.
त्यामध्ये चाकूर मंडळात ६७८ मि.मी सर्वाधिक पाऊस झाला असून शेळगांव मंडळात ५२३ मि.मी, वडवळ मंडळात ४८७ मि.मी, इारी बु. ३८५, चाकूर तालुक्यातील मागील काळातील पार्श्वभूमी लक्षात घेता कोरडा व ओला दुष्काळ नेहमीच पहायला मिळाला आहे. आज समाधानकारक परिस्थिती असल्याने चाकूर शहरासह सहा गावच्या परिसरात निश्चितच पाणी पातळीत वाढ झाली आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकांना देखील होणार आहे. या पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून तलावातून पाणी सांडव्याबाहेर ओसंडून वाहत आहे.
नळेगाव ५५५ आणि आष्टा मंडळात ४६७ मि.मी पाऊस झाल्याने तालुक्यातील जवळपास पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या मुसळधार पावसामुळे चाकूर, नळेगाव, चापोली, वडवळ ना, जानवळ, रोहिणा, झरी या भागात पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बोथी तलाव क्षमतेने भरलाअसून तो ओव्हरफ्लो झाला आहे. बोथी तलावाची १.७१ द.ल.घ.मी एवढी क्षमता असून तो १०० टक्के भरून सांडव्याबाहेर वाहू लागला आहे.
या तलावातून चाकूर, हणमंतवाडी, हणमंतवाडी तांडा, तीर्थवाडी, सरणवाडी, बोथी, बोथी तांडा या गावांना पाणीपुरवठा केला जातो. बोथी तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक गावांसह, शेतकरी, गुरं, ढोर आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यापूर्वी बोथी तलाव २००४, २०१८ आणि २०२४ मध्ये ओसंडून वाहिला आहे. बोथी तलावात सांडोळ, महांडोळ, रोहिणा आणि नागेशवाडी येथून पाण्याचा जास्त विसर्ग होऊन ते बोथी तलावात येऊन साचले जाते.
यामुळे बोथी तलावात पाण्याची वाढ झाली आहे. तो तलाव तुडुंब भरून सांडव्याबाहेर बाहू लागल्याने चाकूरसह अन्य सहा गावांचा पाण्याचा मोठा प्रश्न तूर्तास तरी मिटला असून शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.