Latur District Bank election vote counting | लातूर जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? आज मतमोजणी

विक्रमी ९९.४०% मतदान, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Latur District Bank
Latur District Bank
Published on: 
Updated on: 

लातूर : जिल्ह्याच्या सहकार आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रविवारी तब्बल ९९.४० टक्के मतदान झाले. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Latur District Bank
Latur Crime Branch Attacked | पळशीमध्ये लातूर गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला; सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 6 कर्मचारी जखमी

महायुती सरकारमधील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या महाआघाडीच्या पॅनेलला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून आज मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल रिंगणात होते. तर दुसरीकडे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, बसवराज पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलने आव्हान उभे केले.

Latur District Bank
Latur Farmer Diwali Advance : लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १९१ कोटींची मदत

एकूण १९ जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १५ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण ९९९ मतदारांपैकी ९९३ मतदारांनी हक्क बजावला. केवळ पाच मतदार मतदानापासून दूर राहिले. आज होणाऱ्या मतमोजणीतून बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.