Latur Crime Branch Attacked | पळशीमध्ये लातूर गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला; सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 6 कर्मचारी जखमी

हट्टा पोलिस ठाण्यात 9 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा
 Crime News
Crime News Pudhari
Published on: 
Updated on: 

Vasmat Palashi Attack

वसमत: तालुक्यातील पळशी येथे घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेसाठी आलेल्या लातूर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर जमावाने हल्ला गेला. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी 9 जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

लातूर जिल्ह्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात वसमत तालुक्यातील पळशी येथील एका आरोपीचा सहभाग असल्याची माहिती लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग माने यांच्यासह सहा कर्मचारी आरोपीच्या अटकेसाठी आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पळशी येथे आले होते.

 Crime News
Hingoli News : कळमनुरी न.प., पं.स.सह पशुसंवर्धन कार्यालयांच्या जमिनीप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, लातूरचे पोलिस आल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या 9 जणांनी पोलिसांवर हल्ला चढविला. पोलिसांना काही कळण्याच्या आतच त्यांना लाकडाचा दांडा व लोखंडी रॉडने मारहाण सुरु झाली. या मारहाणीत सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग माने यांच्यासह कर्मचारी जखमी झाले. या मारहाणीनंतर 9 जण घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, जमादार कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड, शिवा पतंगे, संदीप चव्हाण, गणेश सुर्यवंशी, भारशंकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी लातूर पोलिसांना तातडीने उपचारासाठी हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पोलिसांचे पथक लातूरचा रवाना झाले.

 Crime News
Hingoli Crime : औंढा नागनाथ तालुक्यात दुहेरी हत्याकांड: सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद, संतापाच्या भरात पुतण्याने संपवले काका-काकूंना!

या प्रकरणी हट्टा पोलिसांनी सुदर्शन शिंदे, राजू शिंदे, विकी शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह अन्य पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींच्या शोधासाठी हिंगोली पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news