Latur Rain Update : लातूर जिल्ह्याला पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा

जळकोट तालुक्याचा अपवाद वगळता लातूर जिल्ह्यातील बऱ्यांच गावांत पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने अजुनही पेरणीस गती आली नाही.
Nanded Rain
पिकांना पावसाची प्रतीक्षाFile Photo
Published on
Updated on

Latur district awaits rainfall suitable for sowing

लातूर, पुढारी वृतसेवा : जळकोट तालुक्याचा अपवाद वगळता लातूर जिल्ह्यातील बऱ्यांच गावांत पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने अजुनही पेरणीस गती आली नाही. काही गावातील शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर चाड्यावर मुठ धरली असली तरी पाऊस पडत नसल्याने ते धास्तावले आहेत.

Nanded Rain
Latur Agriculture News : औसा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या रखडल्या

अहमदपूर निलंगा औसा या तालुक्यात पाऊस पडला असला तरी तो पेरणीसाठी समाधानकारक नाही. पेरणीसाठी सलग १०० मीमी पावसाची व जमिनीत किमान सहा इंचाची गरज असते. पेरणीसाठी अशी अनुकुलता अजुनही झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान आकाशात ढग येत असले तरी ते बरसत नसल्याने काळजी वाढली आहे.

Nanded Rain
Water Scarcity : पाटोदा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट झाले गडद

रस्ते भिजण्यापुरता शिडकावा होत आहे. कधी जोरधारा बरसल्या तरी पाच दहा मिनीटातच त्या ओसरत आहेत. नेहमीप्रमाणे लातूर शहरात शनिवारीही असेच वातावरण होते. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news