Latur Crime : उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ९ लाख ८७ हजारांचा गुटखा जप्त, दोघे जेरबंद

Latur Udgir gutkha raid- बिदर गेट परिसरात सापळा; प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक
 Latur Udgir gutkha raid
Latur Udgir gutkha raidPudhari crime
Published on: 
Updated on: 

उदगीर : महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी बिदर गेट, ठाकरे चौक परिसरात सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच ८ लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ९ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गु.र.नं. ७१९ /२०२६ कलम १२३, २२३ , २७४, २७५ , ३ (५) BNS सह कलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १४ /१० /२०२६ रोजी रात्री ९:३० वाजता बिदर गेट, ठाकरे चौकात पोलीस अंमलदार बजरंग नागनाथ गजलवार, ब. नं. १८४६,ने. पोलिस स्टेशन उदगीर ग्रामीण हे पेट्रोलिंग करीत असताना संशयित कार क्रमांक एम. एच. बी. एफ. ९३९० मारुती सुझुकी डिझायर ही थांबवून तपासली. तर त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ पान मसाला, सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखूजन्य गुटखा आढळून आला.

 Latur Udgir gutkha raid
Latur Accident | लातूर-झहिराबाद महामार्गावर दुचाकींची धडक; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मंचक रघुनाथ मोटे (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. आपोली, ता. गंगाखेड, जि. परभणी), मोतीराम मुंजाजी गायकवाड (वय ३९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आपोली, ता. गंगाखेड, जि. परभणी) या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरवटे हे करीत आहेत.

 Latur Udgir gutkha raid
Latur Crime | लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात १६ लाखांची चोरी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news