Latur Accident | लातूर-झहिराबाद महामार्गावर दुचाकींची धडक; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

म्हसोबावाडी पाटीजवळ अपघात; समोरून येणाऱ्या दुचाकीवर तिघे, चालकासह तिघे पसार
Latur Bike Collision ITI Student Death
Latur Bike Collision ITI Student DeathPudhari
Published on: 
Updated on: 

Latur Bike Collision ITI Student Death

निलंगा : लातूर-झहिराबाद महामार्गावरील म्हसोबावाडी पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. प्रफुल्ल काळे (वय १८, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी (दि. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रफुल्ल काळे हा माळेगाव कल्याणी येथून दुचाकीवरून निलंगा येथील आयटीआयमध्ये जात होता. म्हसोबावाडी पाटीजवळ तो पोहोचला असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रफुल्लच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Latur Bike Collision ITI Student Death
Latur News : पळशी येथील शेतकऱ्याने जीवन संपवले

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रफुल्लला तातडीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. माळेगाव कल्याणी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, प्रफुल्लला धडक देणाऱ्या दुचाकीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत तिघेजण प्रवास करत होते. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर संबंधित दुचाकीचालक आणि त्याचे दोन्ही साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.

औराद पोलिसांनी अपघातातील दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. पसार झालेल्या चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Latur Bike Collision ITI Student Death
Latur News | चाकूरच्या पाणीटंचाईवर प्रशासन ॲक्शन मोडवर; अवैध पाणी उपशावर कारवाईचे निर्देश

हेल्मेट गाडीला अडकवले, डोक्याला नाही!

मृत प्रफुल्लकडे हेल्मेट होते; मात्र त्याने ते डोक्यात न घालता दुचाकीला अडकवून ठेवले होते. अपघातावेळी हेल्मेट डोक्यात असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. केवळ काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news