Latur Crime News : कारची काच फोडून ४० हजारांची रोकड लंपास

बसस्थानक परिसरातील सीसीटीव्हीत घटनाक्रम कैद; चोरट्यांचा शोध सुरू
Latur Crime News
Latur Crime News : कारची काच फोडून ४० हजारांची रोकड लंपासfile photo
Published on
Updated on

Latur Crime News: Rs 40,000 cash stolen by breaking car window

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा शहरातील नवीन बसस्थानक परिसरात भरदिवसा पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली. संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरीपूर्वी संशयितांनी वाहनाची रेकी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.

Latur Crime News
Beed Crime | पुन्हा एकदा दिवसाढवळ्या महिलेचे मंगळसूत्र ओरबडले; पोलिसांचा ‘नो रिस्पॉन्स’, नागरिकांमधून तीव्र संताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आपली कार (एमएच-२४ सीडी-७६८६) नवीन बसस्थानक परिसरात पार्क करून समोरील एका पतसंस्थेत कामानिमित्त प्रवेश केला होता. याच संधीचा फायदा घेत आधीपासून पाळत ठेवून असलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूची समोरील काच फोडली.

त्यानंतर कारमधील ४० हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन ते दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये दोन संशयित दुचाकीवरून बॅग घेऊन जाताना दिसून आले आहेत.

Latur Crime News
Jalna Crime News : व्यापाऱ्याच्या स्कूटरमधून भरदिवसा ७ लाखांची चोरी

चोरीपूर्वी बँक परिसरात रेकी

प्राथमिक तपासात संशयितांनी चोरीपूर्वी शहरातील काही बँका व आर्थिक संस्थांच्या परिसरात रेकी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांनी संबंधित कारचा काही अंतरापर्यंत पाठलाग केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेवण डमाले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news