Jalna Crime News : व्यापाऱ्याच्या स्कूटरमधून भरदिवसा ७ लाखांची चोरी

नाथबाबा मंदिराजवळील घटना : सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा
Jalna Crime News
Jalna Crime News : व्यापाऱ्याच्या स्कूटरमधून भरदिवसा ७ लाखांची चोरीpudhari photo
Published on
Updated on

₹7 lakh stolen from trader's scooter in broad daylight

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाथ बाबा गल्ली परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक चोरीची घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या एका व्यापाऱ्याच्या स्कूटरची डिक्की उघडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ७ लाख रुपये रोख रक्कम लंपास केली.

Jalna Crime News
Bogus Property Registrations : बोगस रजिस्ट्रीचे 'केंद्र' बनले छत्रपती संभाजीनगर

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित किराणा मालाचे व्यापारी दिपक सच्चानंद यांचे जुना मोंढा भागात किराणा मालाचे दुकान आहे. दररोज दुकान उघडण्यापुर्वी ते सकाळी नाथ बाबा मंदिर परिसरात दर्शनासाठी जातात. सोमवारी त्यानी स्कूटर मंदिराजवळ उभी केली होती. यावेळी स्कुनटीच्या डिक्कीत दुकानात नेण्यासाठीची रोख रक्कम त्यांीनी ठेवली होती. दर्शन करून परत आल्यानंतर त्यांीना डिक्कीतील पैसे गायब झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू करण्यात केला. चोरट्यांनी स्कूटरची डिक्की उघडून अत्यंत शिताफीने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalna Crime News
Jewelry Stolen : धावत्या बसमध्ये चढताना महिला प्रवाशाचे दागिने चोरले

जालना शहरात यापुर्वीह व्यापाऱ्यांच्या स्कुिटीच्या डिक्कीतुन अशाच प्रकारे पैसे चोरीस जाण्याच्यात घटना घडल्याा आहेत. या पार्श्वभुमीव व्यापाऱ्यांची एव्हढी मोठी रक्कम चोरीस गेल्याशने या घटनेचे गांभीर वाढले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news