Latur Crime : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाला संपवले

अवघ्या ७२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या खूनाचा पर्दाफाश केला.
Latur Crime News
Latur Crime : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाला संपवलेFile Photo
Published on
Updated on

Latur Crime: Brother kills brother over agricultural dispute

लातूर, पुढारी वृत्तसेवाः शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या भावाला संपवले अवघ्या ७२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या खूनाचा पर्दाफाश केला. उल्हास विलास खरोसे (वय ३२ वर्षे, रा. रामलिंग मुदगड) असे आरोपीचे नाव असून त्याला २४ फेब्रुवारी पर्यत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Latur Crime News
Latur Crime : सहा लाख रुपयांचा अपहार, बनावट चोरीचा बनाव उघड

१८ फेब्रुवारी रोजी सकाळी रामलिंग मुदगड शिवारात एका शेताच्या बांधावर गुलाब विलास खर ोसे (वय ३४ वर्षे) हा मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या डोक्यावर मारहाण झाल्याचे तसेच गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यांचे वडील विलास राम खर-ोसे (वय ७० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासार सिरसी पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आले. ते चौकशी करीत होते तथापि मयत व्यक्तीचे कुटुंबीय तपासात सहकार्य न करता जाणून-बुजून माहिती लपवीत होते.

Latur Crime News
Combing operation : लातूरचे एसपी रोडवर, ट्यूशन एरियात कोंबिंग ऑपरेशन

पोलिसांनी मिळवलेल्या पुराव्यावरून संशयाची दिशा मयताच्या सख्ख्या भावाकडे वळली. त्यानुसार उल्हास खरोसे यास ताब्यात घेऊन चौकशी केली, सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या खाक्यापुढे त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

शेतीच्या कारणावरून व कौटुंबिक वादातून भावा-भावांत सतत भांडणे होत होती. या वादाचा राग मनात धरून उल्हास खरोसे याने १७फेब्रुवारी रोजी सायंकाळी शेतातून परत येत असताना त्याचा भाऊ गुलाबवर हल्ला करून त्याचा खून केला. पुढील तपास सहायक पोनि. प्रवीण राठोड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news