Chakur Sanitation Workers | चाकूर शहरात स्वच्छता कंत्राटदाराचा कामगारांच्या जीवाशी खेळ; महिन्याला ११ लाखांचे बिल, तरीही सुरक्षा साधनांचा अभाव

कामगार थेट हातानेच कचरा विलगीकरण करीत असल्याची धक्कादायक बाब समोर
Chakur Sanitation Workers Safety Equipment Issues
स्वच्छता कामगार दररोज नाल्यांमधील साचलेला गाळ, कुजलेला कचरा आणि घाण पाण्यात उतरून साफसफाईची कामे करतातPudhari
Published on
Updated on

Chakur Sanitation Workers Safety Equipment Issues

संग्राम वाघमारे

चाकूर : नगर पंचायत क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्थेसाठी दरमहा लाखो रुपयांचे कंत्राट दिले जात असताना प्रत्यक्षात स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले असून महिन्याला सुमारे ११ लाख २१ हजार रुपयांचे देयके उचलणाऱ्या कंत्राटदाराकडून कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

चाकूर शहरात स्वच्छता कामगार दररोज नाल्यांमधील साचलेला गाळ, कुजलेला कचरा आणि घाण पाण्यात उतरून साफसफाईची कामे करतात. मात्र, त्यांच्या हातात हातमोजे, पायात गमबूट,चेहऱ्यावर मास्क आणि शरीर संरक्षणासाठी आवश्यक पोशाख नसल्यामुळे कामगार थेट हातानेच कचरा विलगीकरण करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Chakur Sanitation Workers Safety Equipment Issues
Chakur Bus Stand | चाकूर बसस्थानकातील सीसीटीव्ही तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

नगर पंचायतच्या वतीने ९ महिन्यासाठी १ कोटी ९१ हजार रुपयाची स्वच्छता निविदा प्रक्रिया पूर्ण करीत असताना संबंधित कंत्राटदाराला मे महिन्यात पत्र देवून पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागात नाले सफाई करीत असताना सर्व मजुर कामगारांना सुरक्षा उपकरणे देण्यात यावे. त्यामध्ये हॅन्ड ग्लोज,मास्क, गमबूट देवूनच कामाला लावण्यात यावे असे पत्र दिले आहे. त्यानंतर मजूर कामगारांचा विमा कवच काढण्यात यावे असे असतानाही याबाबीचे कंत्राटदाराकडून पालन होत नसल्याने कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शहरातील घाण पाणी, दुर्गंधी आणि संसर्गजन्य वातावरणात सातत्याने काम केल्यामुळे कामगारांना त्वचारोग, श्वसनविकार तसेच विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Chakur Sanitation Workers Safety Equipment Issues
Chakur Water Crisis : चाकूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

दरमहा लाखो रुपयांचे कंत्राट देताना कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अटींची अंमलबजावणी का होत नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने कंत्राटदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्वच्छता कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

स्वच्छता कामगार हे शहराच्या आरोग्याचे रक्षण करणारे खरे योद्धे आहेत. मात्र, त्यांनाच मूलभूत सुरक्षा साधनांपासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे. कामगारांना तात्काळ हातमोजे, गमबूट, मास्क, सुरक्षा पोशाख आणि नियमित आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Chakur Sanitation Workers Safety Equipment Issues
Chakur ST Bus accident | १२० प्रवाशांनी भरलेल्या बसचा पाटा तुटला; सुदैवाने मोठा अपघात टळला

दरम्यान सदरील एजन्सीशी संपर्क केला असता स्वच्छता मजूर कामगारांना सुरक्षा कीट वाटप केले आहे, परंतु त्या कीटमधील हातमोजे, गमबूट, मास्क, सुरक्षा पोशाखचा वापर कामगार करीत नसल्याचे सांगितले. दरम्यान, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्वच्छता कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे असून नाले सफाई करणाऱ्या मजूर, कामगारांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा कीट द्यावेच लागते .

-प्रतीक लंबे, मुख्याधिकारी, चाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news