Pudhari Talent Search Exam | चाकूरमध्ये ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.६) ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
Chakur Workshop Response
Chakur Workshop ResponsePudhari
Published on
Updated on

Chakur Workshop Response

चाकूर : पुढारी माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षेनिमित्त चाकूर येथे आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.६) ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी मंदोदरी वाकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी, माजी गटशिक्षणाधिकारी संजय आलमले, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पांचाळ, मुक्तार पटेल तसेच केंद्रप्रमुख सुरेश केंद्रे आणि व्यंकट गुरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत चाकूर तालुक्यातील सुमारे ६० शिक्षक आणि २ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दैनिक ‘पुढारी’च्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Chakur Workshop Response
Latur news | चाकूर तालुक्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी राजमा पिकाला अधिक पसंती

उद्घाटनप्रसंगी बोलताना गटशिक्षण अधिकारी मंदोदरी वाकडे यांनी ‘पुढारी’च्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी पुढारीने वेगळा उपक्रम राबविला असून शिक्षकांनीही या उपक्रमात विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘पुढारी’चे राजेश भोळे यांनी टॅलेंट सर्च परीक्षेचा उद्देश तसेच पुढारी माध्यम समूहाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रमोद हुडगे, ज्ञानोबा येणगे, व्ही. बी. बावगे आणि सी. के. शिरूरे यांनी उपस्थित शिक्षकांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद हुडगे आणि शिवदत्त पांचाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ‘पुढारी’चे संग्राम वाघमारे यांनी केले.

Chakur Workshop Response
Latur ZP promotion fraud : पदोन्नतीसाठी बनावट प्रमाणपत्र,लातूर जि.प.च्या तीन अभियंत्यांवर गुन्हा

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी धनराज सूर्यवंशी, प्रकाश भालके, सोमनाथ केंद्रे, रविंद्र चिमणदरे, एस. आर. जाधव, देविदास हेमनर तसेच राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news