Latur Accident | स्विफ्ट कारच्या धडकेमुळे मोटारसायकलवरील पिता पुत्र ठार, कारचालक घटनास्थळावरुन पसार!

अपघातात उमरगा रेतू येथील उपसरपंच अंकुश विश्वनाथ गित्ते व त्‍यांच्या पुत्राचा दुर्देवी मृत्‍यू
Latur Accident
अपघातात ठार झालेले अंकुश विश्वनाथ गित्ते व ओमकार अंकुश गित्ते
Published on
Updated on

जळकोट ः शिरुर ताजबंद - मुखेड राज्य महामार्गावरील उमरगा रेतू पाटी ( ता. जळकोट) येथे स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने ग्राम पंचायत उमरगा रेतू येथील उपसरपंच व शेतकरी अंकुश विश्वनाथ गित्ते वय 58 वर्षे व त्यांचा पुत्र ओमकार अंकुश गित्ते वय 25 वर्षे हे पिता पुत्र ठार झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अहमदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

उपसरपंच अंकुश गित्ते व त्यांचा पुत्र ओमकार गित्ते हे राज्य महामार्गावरील शेताकडून मोटारसायकवरने आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी जांबकडून हडोळतीकडे येणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या एम एच 24 बी एच 2294 या डिझायर कारने त्यांच्या मोटारसायकला जोरदार धडक दिली. या धडकेने हे पिता पुत्र गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अहमदपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Latur Accident
Latur Accident |‎ करजखेडा येथे भरधाव जीपची दोन कारला धडक : भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

ही धडक दिल्यानंतर कार खड्ड्यात जाऊन पडली आहे. या दिल्यानंतर कारचालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. अपघातस्थळी जळकोट पोलीस दाखल झाले व त्यांनी घटनेची पाहणी केली. पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उमरगा रेतू व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news