Gutkha Seized : कारसह पावणेबारा लाखांचा गुटखा जप्त

शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई
Gutkha Seized
Gutkha Seized : कारसह पावणेबारा लाखांचा गुटखा जप्तfile photo
Published on
Updated on

Gutkha worth ₹11.75 lakh seized along with a car

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : शिरूर अनंतपाळ पोलिसांनी तळेगाव (दे.) परिसरात धडक कारवाई करत ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, जर्दा आणि एर्टिगा कार जप्त केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Gutkha Seized
Chhatrapati Sambhajinagar : कन्नड शहरातील घरातून सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास एमएच-२४ एएस-४६२८ क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या सुझुकी एर्टिगा कारची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.

कारवाईत २ लाख ८३ हजार ९२० रुपयांचा पान मसाला, १ लाख २१ हजार ६८० रुपयांचा अन्य एका कंपनीचा मसाला, २२ हजार ५०० रुपयांचा यू. के. जाफरानी जर्दा तसेच ७लाख ५० हजार रुपयांची एर्टिगा कार असा एकूण ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gutkha Seized
Latur Gutkha Seized | शिरूर अनंतपाळ पोलिसांची मोठी कारवाई; ११.७८ लाखांचा गुटखा व वाहन जप्त

या प्रकरणी सय्यद मोजम आजम व इब्राहीम तांबोळी (रा. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... पोलिस हवालदार गौतम घाडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस निरीक्षक भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रायबोळे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news