Latur Gutkha Seized | शिरूर अनंतपाळ पोलिसांची मोठी कारवाई; ११.७८ लाखांचा गुटखा व वाहन जप्त

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, जर्दा आणि एक चारचाकी वाहन जप्त
Shirur Anantpal Gutkha Bust
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, जर्दा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Pudhari
Published on
Updated on

Shirur Anantpal Gutkha Bust

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ पोलिसांनी तळेगाव (दे.) परिसरात गुरुवारी पहाटे धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, जर्दा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव (दे.) येथे एमएच-२४ एएस-४६२८ क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या सुझुकी एर्टिगा कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले.

Shirur Anantpal Gutkha Bust
Latur Police Return Mobiles-हरवलेला मोबाईल पुन्हा मालकाच्या हाती; लातूर पोलिसांकडून १७१ मोबाईल परत

या कारवाईत २ लाख ८३ हजार ९२० रुपयांचा विमल पान मसाला, १ लाख २१ हजार ६८० रुपयांचा व्ही-१ पान मसाला, २२ हजार ५०० रुपयांचा यू.के. जाफरानी जर्दा तसेच ७ लाख ५० हजार रुपये किमतीची सुझुकी एर्टिगा कार असा एकूण ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सय्यद मोजम आजम आणि इब्राहीम तांबोळी (रा. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur Anantpal Gutkha Bust
Latur police recruitment : लातूर पोलिस भरतीचा थरार सुरू!

पोलीस हवालदार गौतम दशरथ घाडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रायबोळे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news