Chhatrapati Sambhajinagar : कन्नड शहरातील घरातून सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त

करीमनगर परिसरात पोलिसांची धडक कारवाई
Gutka Seized
कन्नड शहरातील घरातून सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त
Published on
Updated on

कन्नड : कन्नड शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत करीमनगर गल्ली नं ९ परिसरातील एका घरातून सुमारे २ लाख २३ हजार ४५० किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.

पोलिसांनी समीर शेख चाँद यांच्या राहत्या घरी छापा टाकून झडती घेतली असता विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू तसेच अन्य प्रतिबंधित उत्पादनांचा समावेश असून त्याची एकूण किंमत २ लाख २३ हजार ४५० इतकी आहे. शहरात गुटख्याचा पुरवठा नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे, सहाय्यक फौजदार नासिर पठाण, पोलिस नाईक प्रवीण बर्डे, पोलिस अंमलदार सागर सुलाने आणि प्रदीप चव्हाण यांच्या पथकाने केली. जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news