Latur News : विरोधकांच्या संभ्रमाला राष्ट्रवादाने सडेतोड उत्तर द्या !

भाजपा प्रदेश सरचिटणीस राणे यांचे आवाहन; राष्ट्रचिंतन संवादाला प्रतिसाद
Latur News
Latur News : विरोधकांच्या संभ्रमाला राष्ट्रवादाने सडेतोड उत्तर द्या !file photo
Published on: 
Updated on: 

Give a strong answer to the opposition's confusion with nationalism!

लातूर, पुढारी वृत्तसेवाः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने विकासाचा झंझावात निर्माण केला आहे. त्यामुळे विरोधक निराश होऊन जनतेमध्ये खोटा संभ्रम निर्माण करीत आहेत. या संभ्रमाला प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांनी केले.

Latur News
Autism : ऑटिझमग्रस्त मुलांमध्येही विशेष क्षमता; प्रेम, सन्मान अन् समान संधी द्या

'अराजकता हटवा, लोकशाही वाचवा' अभियानांतर्गत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने प्रयाग कराड नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रचिंतन संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे बोलत होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मराठवाडा संयोजक नितीन काळे, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी खासदार सुधाकर शृंगारे, रामचंद्र तिरुके आणि कार्यक्रमाचे संयोजक तेजस कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

विरोधक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खोट्या कथनाला इतिहास, संविधान आणि वस्तुस्थितीच्या आधारेउत्तर दिले पाहिजे. भाजपचे राजकारण सत्तेसाठी नव्हे, तर राष्ट्रनिर्माणासाठी आहे.

राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि व्यक्ती सर्वांत शेवटी, हे पक्षाचे धोरण असल्याचे राणे म्हणाले. अजित पाटील कव्हेकर यांनीही संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा गैरवापर करून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होता कामा नयेत, असे सांगितले. नितीन काळे यांनीही मार्गदर्शन केले. स्वागतपर प्रास्ताविक तेजस कराड यांनी केले.

Latur News
Chakur Teachers Society | चाकूर शिक्षक पतसंस्थेच्या ६ संचालकांना अपात्रतेची नोटीस

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, वंदे मातरम्‌आ णि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन झाले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस तुकाराम गोरे, प्रमोद गुडे, प्रवीण कस्तुरे, रागिणी यादव, स्वीकृत नगरसेवक अ ँड. प्रदीप मोरे, उदय देशपांडे, दयानंद जाधव, सुरेश राठोड, व्यंकटेश कुलकर्णी, सीमा करपे, सचिनसुरवसे, रोहित पाटील, गोपाळ वांगे, राहुल भुतडा, काकासाहेब चौघुले, निर्मला कांबळे, सुरेश जाधव, चंद्रकांत साळुंके, शामसुंदर मानधना, ओम धरणे, दिग्विजय काथवटे, शिवशंकर कावळे, अनिल पतंगे, संतोष तिवारी आणि अॅड. अस्मिता काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.