Chakur Teachers Society | चाकूर शिक्षक पतसंस्थेच्या ६ संचालकांना अपात्रतेची नोटीस

कर्जाची परतफेड थकल्याचा ठपका; सहाय्यक निबंधकांसमोर सोमवारी सुनावणी
Chakur Teachers Credit Society
Chakur Teachers Credit SocietyPudhari
Published on: 
Updated on: 

Chakur Teachers Credit Society Disqualification Notice

चाकूर : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ६ संचालकांवर कर्जाची परतफेड थकविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींनुसार त्यांना संचालकपदावरून अपात्र ठरवून काढून का टाकू नये, अशी कारणे दाखवा नोटीस सहाय्यक निबंधकाने ३० ऑक्टोबर बजावली होती. याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.

पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर केलेल्या पत्रानुसार, संचालिका गोपिका बुड्ढे, संचालक चंद्रकांत भोजने, विरभद्र बावगे, बालाजी येळापुरे, प्रल्हाद इगे आणि शरद हुडगे यांनी पतसंस्थेकडून लाखों रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना त्यांनी दरमहा मुद्दल व नियमानुसार व्याज भरण्याचे मान्य केले होते. मात्र, काही महिन्यांत मुद्दलाची परतफेड कमी केल्याचे तसेच परतफेड थकित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Chakur Teachers Credit Society
Sandalwood Seized Chakur | चंदन तस्करीचा डाव उधळला; चाकूर पोलिसांकडून ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढे नोटीशीत कर्ज घेताना ते सर्वजण संस्थेचे विद्यमान संचालक आहेत.असे म्हटले आहे. ते थकबाकीदार असतानाही पदाचा गैरवापर केला आहे. तसेच संस्थेच्या मंजूर उपविधीतील तरतुदींनुसार त्यांचे संचालकपद संपुष्टात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कअ (१) (एक) मधील (ड) नुसार बिगर कृषी पतसंस्थेचे कर्ज किंवा त्याचा कोणताही हप्ता फेडण्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीस समिती सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. तसेच कलम ७३ क अ (२) मध्ये पोटकलम (१) नुसार अपात्रता निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीचे समिती सदस्यत्व संपुष्टात येते.

Chakur Teachers Credit Society
Chakur Protest | चाकूर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलसाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे आंदोलन

या पार्श्वभूमीवर सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांनी वरील सहाजणांना संस्थेच्या संचालकपदावरून अपात्र ठरवून कलम ७८अ (१) अन्वये काढून का टाकू नये, याबाबत लेखी खुलासा मागविला आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष (वादी) आणि सहा संचालक (प्रतिवादी) या सहाजणांना आवश्यक कागदपत्रांसह १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चाकूर यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सुनावणीत संबंधितांचे म्हणणे आणि सादर होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पुढील कार्यवाही होणार असल्याने शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळात या प्रकरणामुळे काय घडामोडी होतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था संचालकांना थकीत कर्ज परतफेड प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संस्थेचे अध्यक्ष (वादी) आणि सहा संचालक (प्रतिवादी) या सहाजणांची चाकूर कार्यालयात सुनावणी होणार आहे.

- अमोल वाघमारे, सहाय्यक निबंधक, चाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.