Dr J.M. Waghmare: डॉ. जे. एम. वाघमारे यांचे निधन; लातूर पॅटर्नचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, माजी खासदार व ज्येष्ठ विचारवंतांना श्रद्धांजली
Dr J.M. Waghmare
Dr J.M. WaghmarePudhari
Published on
Updated on

डॉ. जे. एम. वाघमारे यांची माहिती

ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, लातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. जे. एम. वाघमारे यांचे लातूर येथे आज शनिवारी त्यांच्या निवासस्थानी सकाळी निधन झाले.

Dr J.M. Waghmare
Chakur Panchayat Samiti news| चाकूर पंचायत समिती सभापतीसाठी हाके, नागरगोजे, केदार चर्चेत...

गेली काही दिवसापासून ते आजारी होते राज्यभर प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या शाहू महाविद्यालयाच्या उभारणीत डॉ. वाघमारे यांचा मोलाचा वाटा होता , ते या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सर्वदूर प्रसिद्ध शैक्षणिक लातूर पॅटर्नची निर्मिती त्यांनी याच महाविद्यालयात केली. 1994 ते 1999 या कालावधीत ते स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू होते डिसेंबर 2001 मध्ये ते लातूरचे नगराध्यक्ष झाले.

Dr J.M. Waghmare
Ramdas Athawale : रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा पक्ष

लातूर, बीड ,परभणी, उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीवर ते विशेष निमंत्रित होते. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य . साहित्य संस्कृती मंडळ सदस्य , गॅझेटीयर संपादक मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 28 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. मूठभर माती हे त्यांचे आत्मचरित्र आहे.

Dr J.M. Waghmare
MLA Ramesh Karad : शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य

अमेरिका, इंग्लंड,श्रीलंका, कॅनडा आदी देशात त्यांनी शैक्षणिक दौरे केले. समाजसेवेत त्यांची वेगळी ओळख होती. भूकंपग्रस्त चलबुर्गा हे जातीपाती विरहित गाव त्यांनी उभारले होते.त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. संयुक्त राष्ट्र संघ यु एन जनरल असेंबलीच्या 64 व्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून त्यांचा समावेश होता.

Dr J.M. Waghmare
Renapur water supply issue : १ कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकली

त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. शिक्षणाचा विस्तार तळागाळापर्यंत व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. काही दिवसापूर्वी ते त्यांच्या घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news