Latur News : पावसाच्या संकटावरून धीरज देशमुखांचा सरकारला संदेश

हवामान बदलाच्या संकटावर कायमस्वरूपी धोरण आखा
Latur News
Latur News : पावसाच्या संकटावरून धीरज देशमुखांचा सरकारला संदेशFile Photo
Published on
Updated on

Dhiraj Deshmukh's message to the government regarding the rain crisis

लातूर : शहाजी पवार

माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे मा अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे एकाच वेळी आर्थिक मदत आणि तातडीच्या तांत्रिक उपाययो-जनांची मागणी करून शेतकरी प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करावे आणि ढगाळ वातावरण असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी करून देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे लक्ष मराठवाड्याकडे वेधले आहे.

Latur News
Latur Farmer Protest | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महिला रस्त्यावर; वाळलेले सोयाबीन घेऊन तहसील कार्यालयावर धडक

पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले तरी समाधानकारक पाऊस नाही. पिके धोक्यात आली असून भूजल पातळी, पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ पंचनामे आणि मदतीच्या घोषणांपुरते न थांबता संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, हा देशमुख यांच्या माग-ण्यांमागील राजकीय सूर आहे.

विशेष पॅकेजची मागणी करताना त्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हानिहाय व तालुका-निहाय परिस्थितीचे मूल्यांकन, पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे, थेट नुकसानभ-रपाई, पीक कर्जाचे पुनर्गठन, व्याजात सवलत आणि कर्जवसुलीला स्थगिती अशा उपाययो-जनांचा आग्रह धरला आहे. कोरडवाहूशेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान तसेच दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या किंवा चारा बँका सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

त्याचवेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी पुढे करून देशमुख यांनी सरकारसमोर वेगळा पर्यायही ठेवला आहे. प्रयोग यशस्वी होईल याची निश्चितता नसली तरी संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या मागण्या केवळ लातूर पुरत्या मर्यादित न ठेवता संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील पावसाअभावी प्रभावित भागांचा मुद्दा देशमुख यांनी पुढे आणला आहे.

Latur News
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पोहरेगावात ३५० फूट टॉवरवर चढून आंदोलन; प्रशासनाची तारांबळ

त्यामुळे आगामी काळात शेतकरी, पाऊस आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबरोबरच हवामान बदलाच्या संकटावर कायमस्वरूपी धोरण आखावे, अशी मागणी करून देशमुख यांनी हा प्रश्न केवळ यंदाच्या पावसापुरता न ठेवता दीर्घकालीन कृषी धोरणाशी जोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news