Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पोहरेगावात ३५० फूट टॉवरवर चढून आंदोलन; प्रशासनाची तारांबळ

जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
Maratha Reservation
मराठा आरक्षणासाठी पोहरेगावात ३५० फूट टॉवरवर चढून आंदोलन
Published on
Updated on

रेणापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, या मागणीसाठी रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सोमवारी साडेतीनशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन केले. सकाळी आठ वाजता सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग ९ तास सुरू राहिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, नायब तहसीलदार सोनकांबळे, मंडळ अधिकारी सानिया सौदागर, तलाठी शिंदे यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून आंदोलकांना खाली उतरण्याची वारंवार विनंती करण्यात आली, मात्र आंदोलक आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहिले.

दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलकांशी चर्चा घडवून आणण्यात आली. कोणत्याही आंदोलकाच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये किंवा शरीराला इजा होऊ नये, यासाठी आंदोलन तात्पुरते मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली.या विनंतीला प्रतिसाद देत आंदोलकांनी सायंकाळी पाच वाजता आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात परमेश्वर शिंदे, सचिदानंद मोरे, दशरथ केसरे, अभिषेक केसरे, शिवकिरण माने, विश्वजीत कणसे, किसन शिंदे, शैलेश सातापुरे, अमित शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारने मराठा आरक्षणावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news