Latur News : तुरीचा झाला खराटा; रब्बीच्या आशाही मावळल्या !

अहमदपूर तालुक्यातील चित्र, अस्मानी संकटाने बळीराजा हतबल
Latur News
तुरीचा झाला खराटा; रब्बीच्या आशाही मावळल्या !file photo
Published on: 
Updated on: 

Crops of soybean, cotton, moong and urad in the kharif season disappointed the farmers

अहमदपूर पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी काळ्या आईच्या कुशीत स्वप्नांची पेरणी करणाऱ्या बळीराजावर यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटांची मालिका ओढवली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग आणि उडदाच्या पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केली. आता उरलीसुरली आशा तुरीच्या पिकावर होती. मात्र पावसाअभावी तुरीचे पीकही करपण्याच्या मार्गावर असून, शेतात उभ्या तुरीचा अक्षरशः खराटा झाला आहे. त्यामुळे खरीपपाठोपाठ रब्बी हंगामाच्या अपेक्षांवरही पाणी फिरण्याची चिन्हे आहेत.

Latur News
Latur Crime | उदगीरच्या PMA हॉस्पिटलमध्ये उपचारात निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू? डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल!

२४ आणि २५ ऑक्टोबरदरम्यान मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन तुरीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. तुरीला फुलोरा आला असला तरी ओलाव्याअभावी पिकाची वाढ खुंटली आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. अहमदपूर तालुक्यात ज्वारी, गहू, जवस, हरभरा आणि वाटाणा या रब्बी पिकांच्या पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी केली.

होती. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हाच आधार ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पेरणी केली तरी पिके जगतील का, याची चिंता सतावत आहे. पावसाअभावी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे.

Latur News
Digital arrest | डिजिटल अरेस्टमधून २८.५१ लाखांचा गंडा; सहा अटकेत

कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा खंड, कधी दुष्काळ तर कधी बाजारभावाचा फटका, अशा संकटांशी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. यंदा खरीप हंगामाने निराशा केली, तुरीनेही साथ सोडली आणि रब्बीच्या आशाही धूसर झाल्या आहेत. पिकांसोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने पीक नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. यंदाची दिवाळी आनंदात साजरी करता येईल का, मुलींचे हात पिवळे करण्याचे स्वप्न पूर्ण होईल का, अशा विवंचनेत बळीराजा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.