Latur Crime | उदगीरच्या PMA हॉस्पिटलमध्ये उपचारात निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू? डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल!

वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर फिर्याद, शवविच्छेदन अहवाल व कागदपत्रांच्या आधारे गुन्हा नोंद
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

उदगीर : उपचारात निष्काळजीपणा केल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत उदगीर शहरातील PMA हॉस्पिटलचे डॉ. नागनाथ कवडगावे यांच्याविरोधात उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैद्यकीय समितीने उपचारात हयगय झाल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११/२/२०२६ रोजी उदगीर येथील PMA हॉस्पिटलमध्ये फिर्यादीची बहीण प्रतिज्ञा प्रमोदकुमार नेत्रगावकर वय २६ वर्षे रा. नेत्रगाव ता. उदगीर ही उपचारासाठी दाखल होती. या दरम्यान हॉस्पिटलचे डॉ. नागनाथ कवडगावे यांनी तिच्यावर चुकीचा औषधोपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रतीक्षित प्रमोदकुमार नेत्रगावकर यांनी केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील वैद्यकीय अधिकारी समितीने सर्व कागदपत्रे, जबाब आणि रुग्णपत्रिका यांचे अवलोकन केले. समितीने दिलेल्या अभिप्रायात डॉक्टरांनी विहित मार्गदर्शक तत्वांनुसार उपचार केल्याचे दिसून येत नाही, वैद्यकीय उपचारात डॉक्टरांकडून हयगय झाल्याचे दिसून येते" असे नमूद केले आहे. तसेच मयताची माहिती पोलिसांनादेणे बंधनकारक असताना ती न देता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचा आरोपही फिर्यादीत आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.