

Corruption worth crores in the Eidgah complex of the Waqf Board in Nilanga
निलंगा, पुढारी वृत्तसेवा येथील वक्फ मंडळाच्या ईदगाह कॉम्प्लेक्स मध्ये कमिटीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मुहम्मद खुर्रम अब्दुल रशीद साहब यांनी राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील ईदगाह कॉम्प्लेक्स सुरू झाल्यापासून एकच कमिटी काम करीत आहे. ईदगाह कॉम्प्-लेक्सचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे मात्र वक्फ मंडळाला कमी उत्पन्न दाखवून आजतागायत या कमिटीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. सद्यःस्थितीत असलेली कमिटी ही कमी उत्पन्न दाखवून फंड कमी भरत आहेत त्यामुळे वक्फ मंडळाचे नुकसान होत आहे.
बोर्डाच्या मालमत्तेचा गैरवापर होत आहे. यामध्ये मालमत्ता भाड्याने देण्यामध्ये अनियमितता, तसेच अतिक्रमणधारकांना मालमत्ता ताब्यात देण्याचे प्रकार समोर आले आहेत. ही होणारी कोट्यवधींची रक्कम चौकशी करून वसूल करून घ्यावी तसेच मस्जिदच्या पेश इमाम व मौजम यांना सदरील रकमेमधून पगार व मानधन देण्यात यावे. यापूर्वी अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.
मात्र ईदगाह कमिटीची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही चिरिमिरी देऊन चौकशा दडपण्याचा प्रयत्न झाला होता असेही त्यांनी सांगितले. झालेल्या अपहाराची रक्कम वसूल नाही केल्यास वक्फ मंडळावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.