

उदगीर : उदगीर तालुक्यातील शिरोळ जानापूर रस्त्यावरील दुर्गादेवी तांडा येथे इटियॉस कारमधून जाणारा 4 लाख 93 हजार 860 गुटखा व 7 लाख रुपयांची कार असे एकूण 11 लाख 93 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मंगळवारी (1 जुलै) पहाटे पाचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला तीघे फरार झाले असून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 30 जून रोजी रात्री आठच्या सुमारास शिरोळ जानापूर रस्त्यावरील दुर्गादेवी तांडा येथे उपरोक्त कारमध्ये विमल पान मसाला किमत 3 लाख 24 हजार 480 , व्हि-1 तंबाखू किंग नाव 74 हजार 880 , रजनीगंधा पानमसाला 52 हजार 500 , बाबा नवरत्न 42 हजार रुपयांचा माल, इटियॉस कपनीची कार 7 लाख रुपये असा एकुण 11 लाख 93 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल आपले पोलिसांच्या हाती लागला तो त्यांनी जप्त केला.
पोलीस कर्मचारी संतोष माधवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ बंडू केसाळे (रा.वंजारवडा जळकोट (अटक), विनायक महादेव गौड, नागेष अंभाजी दुरनाळे, माधव मोरे (सर्व रा. जाब ता. मुखेड) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पो.उप.नि. लोखंडे हे करीत आहेत.