बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया

जिल्हा परिषद समाजकल्याण व दिव्यांग सक्षमीकरण विभागाची मदत
latur news
बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियाfile photo
Published on
Updated on

Cochlear Implant Surgery for Children

लातूर, पुढारी वृत्तसेवाः जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. याअंतर्गत कर्णबधिर, दिव्यांग व्यक्तींना कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात आली. सदर योजनेअंतर्गत शनिवारी लातूरच्या गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये २ बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे.

latur news
निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : जिल्हाधिकारी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या संकल्पनेतून कानाच्या आजार असलेल्या अथवा दिव्यांग असलेल्या कर्णबधिर व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या ५% दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत सन २०२५-२६ वर्षामध्ये आर्थीक तरतूद करण्यात आली होती.

यातून दोन्ही बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल असलेल्या कुटुंबातील दिव्यांग अथवा कानाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना ही शस्त्रक्रिया करणे शक्य नसते. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या कुटुंबांना आर्थिक सहाय्य या शस्त्रक्रियेसाठी देण्यात येते. याअंतर्गत शनिबारी ही शस्त्रक्रिया लात्रात यशस्वी रित्या सुप्रसिध्द कान, नाक, घसा तज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. सुधिर कदम यांच्यामार्फत पार पडली.

latur news
Jalna News : कुपोषण निर्मूलन, यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी मित्तल

या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या नुतन अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, डॉ. हर्षदा गोरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री संतोषकुमार नाईकवाडी, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक सारडा, आर.बी.एस. के चे जिल्हा समन्वयक अमोल झेंडे, डॉ. रफी गातेगावकर, डॉ. शितल चव्हाण, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अॅड. बस्वेश्वर पसारे, शिरिषकुमार शेरखाने यांनी पुढाकार घेतला होता.

कार्तिक, मन्मथला मिळाला लाभ

महागडी असणारी ही शस्त्रक्रिया सामान्य कुटुंबांना परवडणारी नसते यामुळे जिल्हा परिषदेच्या ५% सेस फंडातून या कुटुंबांना कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. याअंतर्गत लातूर तालुक्यातील कार्तीक ज्योतीराम शिंदे व निलंगा तालुक्यातील सांगवी जेवरी येथील मन्मथ जीवन पाटील या दोन बालकांना हा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही दिव्यांग बालकांच्या कानावर आता आवाज पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news